मिलिंद नगर येथील अवैध धंदे जोमात सुरू, बंद न झाल्यास परीसरातील ग्रामस्थांचा आमरण उपोषणाचा इशारा.
जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरातील मिलिंदनगर भागातील अवैद्य धंदे जोमात सुरू आहे. हे अवैद्य धंदे बंद करावेत या मागणीसाठी परीसरातील नागरिकांनी तहसीलदार व पोलीस स्टेशनला निवेदन दिले आहे. तसेच हे अवैध धंदे बंद झाले नाहीत तर लवकरच आमरणास बसण्याचा इशारा देण्यात आला आहे.
याबाबत काल दि २२ एप्रिल रोजी तहसीलदार साहेब व जामखेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम तायडे यांना मिलिंद नगर भागातील नागरिकांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की जामखेड शहरातील मिलिंद नगर येथील भागामध्ये सध्या अवैध्य धंद्यांचा सुळसुळाट चालू असून यामध्ये ताढी, गांजा, दारू यासारखे मादक पदार्थाची विक्री सर्रास चालू आहे. त्यामुळे सदरील नशेच्या आहारी या भागातील अनेक तरुण नादी लागले आहेत. त्यामुळे मध्यंतरी एका विवाहित युवकाचा मृत्यू झाला आहे.
त्याअगोदर अनेक तरुण यानशेच्या आहारी गेल्यामुळे मृत्यू झाले आहेत मृत्यू झालेले सर्वजण हे विवाहित असून आज त्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत त्यांना लहान लहान मुले असून वयोवृद्ध आई-वडिलांचा आधार संपलेला आहे. वरील बाबींचा विचार करून मिलिंद नगर या भागांमध्ये सुरू असलेल्या अवैध धंदे ताबडतोब बंद करावेत तसे न झाल्यास दिनांक २५ एप्रिल पासुन जामखेड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे लवकरात लवकर हे अवैध धंदे बंद करावेत हीच मिलिंद नगर ग्रामस्थांची मागणी आहे.
यावेळी भिमटोला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गायकवाड, वंचितचे तालुकाध्यक्ष अतिश पारवे, मनसेचे शहराध्यक्ष सनी सदाफुले, अतुल वाघमारे, अजिनाथ शिंदे अलका वाघमारे, अक्षय शिरोळे सुर्यकांत सदाफुले अनिल जावले अँड ऋषीकेश डुचे पोपट फुले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
मिलिंदनगर बरोबरच शहरातील अनेक ठिकाणी अवैद्य धंदे सुरू आहेत मात्र पोलीस प्रशासन याकडे डोळेझाक करीत आहे. मिलिंदनगर नगर भागातील जागृत नागरिकांनी या बाबत जागृकता दाखवली तसेच शहरातील इतर अवैध धंदे बंद व्हावेत यासाठी नागरिकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. मागिल दोन दिसांनपासुन जामखेड शहरात भरदिवसा हाणामारी चे प्रकरणे देखील घडले आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाचा यावर वचक राहीला नाही का असा संतप्त सवाल देखील जामखेड शहरातील नागरिक करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here