कर्जत येथे खुन करुन मृतदेह पुरला जामखेड तालुक्यात, पोलिसांनी केली दोन आरोपींना २४ तासात अटक
जामखेड प्रतिनिधी
कर्जत शहरातील राजीव गांधी नगर परिसरामध्ये राहत असणारा महेश उर्फ दहिष्या नर्गीषा काळे वय ३० वर्ष या युवकाचा काठीने व विटा याने मारहाण करून खून केला व पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जामखेड तालुक्यातील जवळा येथे दगडाखाली पुरून ठेवण्याची खळबळ जनक घटना घडली आहे. याप्रकरणी दोन आरोपींना कर्जत पोलिसांनी २४ तासाच्या आत अटक केली आहे, तर तिसरा आरोपी फरार झाला आहे.
याबाबत घडलेली घटना अशी की नितीन नर्गिशा काळे वय ४० वर्ष राहणार कर्जत यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटला आहे की, दिनांक १८ तारखेला पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान तुषार उर्फ तलाश शिवा काळे, अश्विनी शिवा काळे व गौरी तुषार काळे सर्व राहणार राजीव गांधी नगर झोपडपट्टी कर्जत यांनी फिर्यादीचा भाऊ महेश याचे मोटरसायकलवर अपहरण केले आहे अशी तक्रार दिली होती. दरम्यान या गुन्ह्यातील आरोपी तुषार काळे यास पोलिसांनी अटक केली. व त्याच्या कडून व्यवस्थित चौकशी केली असता त्याने आपण महेश नरगिशा काळे यास मारहाण करून त्याचा खून केला आहे आसे सांगितले व प्रेत पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने जामखेड तालुक्यातील जवळा येथे दगडाच्या ढिगार्‍याखाली मृतदेह पुरून ठेवला आहे अशी कबुली पोलिसांकडे दिली.
यानंतर कर्जत पोलीस आरोपीला घेऊन जवळा येथे गेले. त्यावेळी पोलीस निरीक्षक मारुती मुळक, जामखेड येथील तहसीलदार गणेश माळी, व काही पंच यांच्या समक्ष आरोपीने मृतदेह ज्या ठिकाणी पूरून ठेवला आहे ते ठिकाण दाखवले.
यानंतर पुरलेला मृतदेह वरती काढण्यात आला व दिनांक १९ रोजी सकाळी कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आला. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी तलाश उर्फ तुषार शिवा काळे व गौरी तलाश उर्फ तुषार काळे यांना अटक करण्यात आली असून अश्विनी शिवा काळे ही फरार आहे. या तीनही आरोपींन विरोधात कर्जत पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुषार शिवा काळे व गौरी तुषार काळे यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना आज सोमवार दि २२ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी दिली होती. फरार आसलेल्या तिसर्‍या आरोपीच्या शोधार्थ पोलिस पथके रवाना करण्यात आली आसल्याची माहिती कर्जत पोलिसांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here