जामखेड प्रतिनिधी
शहरातील मोरे वस्ती या ठिकाणी विशाल ठाकरे या तरुणाने पहाटे च्या सुमारास आपल्या रहात्या घरामध्ये पंख्याच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. गळफास घेतला या वेळी त्याचे कुटुंब बाहेरगावी होते मात्र गळफास का घेतला याचे कारण समजू शकले नाही.
मयत विशाल ठाकरे रा मोरे वस्ती याचा वॉटर फिल्टर चा व्यवसाय करीत होता. काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी व मुले हे नातेवाईकांन कडे बाहेरगावी गेले होते. दि आठ रोजी सकाळी मयत विषाल ठाकरे याची आजी त्याला पहायला त्याच्या बंगल्यात आली होती त्या वेळी आवाज देऊनही प्रतीसाद मिळत नव्हता म्हणून तीने खिडकी च्या आत डोकावून पाहिले त्या वेळी विशाल ने गळफास घेतला आसल्याचे लक्षात आले. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्हेडा पो. हे. कॉ बापूसाहेब गव्हाणे यांनी भेट दिली. विशाल याने मागिल काही दिवसांपुर्वी देखील औषध पीऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्याच्यावर तातडीने उपचार केल्याने तो या घटनेत बचावला होता. मात्र पुन्हा काही दिवसातच घरातील छताच्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली आसल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. आत्महत्या का केली याचे कारण मात्र अद्याप समजु शकले नाही. यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालय दाखल करण्यात आला आहे.