जामखेड प्रतिनिधी
आष्टी तालुक्यातील मंगळुर येथील दिंडे वस्तीवरील मायलेक तुरीच्या शेतात काम करीत असताना बिबट्याने पुन्हा या दोघांवर हल्ला केला. या मध्ये मायलेक जखमी झाले असून त्यांना आष्टी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
आष्टी तालुक्यात मागिल चार दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. या पूर्वी दोघांना बिबट्याच्या हल्ल्यात आपले प्राण गमवावे लागले आहेत. शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मंगळुर येथील दिंडे वस्तीवर शिलावती दत्ताञय दिंडे (वय ३३) आणि मुलगा अभिषेक दत्तात्रय दिंडे वय १५ हे मायलेक शेतात तुरीच्या शेंगा तोडत असताना बिबट्याने या दोघांवर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात शिलावती यांच्या हाताला व कमरेला दुखापत झाली तर आभिषेक यांच्या हाताला देखील जखम झाली आहे. दोघांनी आरडाओरडा केल्या नंतर बिबट्याने घटनास्थळावरुन धुम ठोकली. त्यामुळे सुदैवाने या घटनेत जीवीत हानी झाली नाही. या घटनेमुळे आष्टी तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या वनविभागानचे पथक घटनास्थळी दाखल झाले आसल्याची माहिती मिळाली आहे.