Home ताज्या बातम्या अतिक्रमण मुद्दा पेटला, हद्द निश्चित करा, उद्यापासून जामखेड शहर रहाणार बेमुदत बंद

अतिक्रमण मुद्दा पेटला, हद्द निश्चित करा, उद्यापासून जामखेड शहर रहाणार बेमुदत बंद

अतिक्रमण मुद्दा पेटला, हद्द निश्चित करा, उद्यापासून जामखेड शहर रहाणार बेमुदत बंद

राष्ट्रीय महामार्गाच्या उपअभियंता चेमटे यांची टोलवाटोलवी

जामखेड प्रतिनिधी

राष्ट्रीय महामार्ग विभागाचे डेप्युटी इंजिनियर सुजित चेमटे यांनी दि. ५ मार्च २०२६ पर्यंत महामार्गाची अधिकृत हद्द निश्चित करून कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर दि. २६ फेब्रुवारी रोजीचा जामखेड बंद मागे घेतल्यानंतरही दिलेल्या आश्वासनानुसार अतिक्रमण काढण्यासाठीची कोणतीही प्रक्रिया न केल्याने मागे घेतलेले जामखेड बंदचे आंदोलन पुन्हा पुकारले असून राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता सुजित चेमटे व संबधीत वरिष्ठ अधिकारी जोपर्यंत हद्द निश्चित करत नाहीत तोपर्यंत उद्या दि. ६ मार्चपासून सर्व पक्षीय व सर्व सामाजिक संघटना यांच्या वतीने बेमुदत बंद पुकारात येत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तसेच तोडगा न निघाल्यास शनिवारी रास्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे.

जामखेड शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग ५४८ डी जामखेड जिल्हा अहिल्यानगर वरील शहरातील रस्त्याच्या कामाला कायमस्वरूपी, अडथळा ठरणारे अतिक्रमण काढण्यासाठी. दि. २६ मार्च २०२६ पासून अतिक्रमण बाबत अंतिम कार्यवाही होईपर्यंत सर्व पक्षीय जामखेड शहर बेमुदत बंद ठेवण्यात येणार होता मात्र राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता सुजित चेमटे यांनी दिलेल्या लेखी आश्वासना नंतर जामखेडबंद मागे घेण्यात आला होता. गेली साडेतीन वर्षांपासून जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. ते अनेक अडथळे व कासव गतीने सुरू आहे. यामुळे अनेक छोटे मोठे अपघातही झाले आहेत. यामधे अनेक जण जायबंदी तर काहींना आपले जीव गमवावे लागले आहेत. हे काम सुरू असताना अनेक अडचणीन बरोबरच अतिक्रमण काढणे हा मोठा अडथळा ठरत आहे. यासाठी विविध पक्षसंघटनांकडून अनेक आंदोलने तर प्रशासकीय पातळीवर अनेक बैठका. तसेच जिल्हाधिकारी यांनी याठिकाणी प्रत्यक्ष भेटू देऊन अतिक्रमण काढण्याच्या सुचना करूनही काहीच होत नसल्याने अखेर जामखेडकरांनी अखेर सर्वपक्षीय व बेमुदत जामखेड बंदचे हत्यार उपसले होते.

त्याच अनुषंगाने जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 548D मार्गावरील अतिक्रमणाच्या प्रश्नावरून सर्व पक्षीय व सामाजिक संघटनांनी काही दिवसापूर्वी पुकारलेला बेमुदत बंद स्थगित करण्यात आला होता. मात्र सर्व पक्षीय साखळी उपोषण सुरू राहणार ठेवण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर आज दि. ५ मार्च रोजी निर्धारित मुदतीत हद्द निश्चित न झाल्याने उदया शुक्रवार दि.६ मार्च पासून सर्व पक्षीय व सामाजिक संघटनानी जामखेड शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग ५६१ व ५४८ – डी मार्गात अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणा मुळे जामखेड शहर बेमुदत बंद पुकारला आहे.

चौकट

राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता चेमटे यांनी ५ मार्च २०२६ पर्यंत महामार्गाची हद्द निश्चित करण्याचे लेखी दिले होते. परंतू हद्द निश्चितीची कोणतेही प्रक्रिया न झालेमुळे राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता श्री. चेमटे यांनी व संबधीत वरिष्ठ अधिकारी हद्द निश्चित करत नाहीत तोपर्यंत शुक्रवार दि ५ मार्च २०२६ रोजी पासुन सर्व पक्षीय व सर्व सामाजिक संघटना यांच्या वतीने बेमुदत बंद पुकाराला आहे. तरी सर्व व्यापारी, ग्रामस्थ व पत्रकार बांधव यांनी शहर विकासासाठी सहकार्य करावे असेही आवाहन आंदोलकांन कडून करण्यात आले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!