{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"adjust":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}
अंधारातच महीलांचे जामखेड महावितरण कार्यालयात ठीय्या आंदोलन
महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराचा निषेध

जामखेड प्रतिनिधी

शहरातील मिलिंदनगर भागातील विजेचा प्रश्न गंभीर झाल्याने या परीसरात महीला व नागरीकांनी काल दि २१ रोजी रात्री आठ वाजता जामखेड महावितरणच्या कार्यालयातच ठीय्या आंदोलन केले. तसेच जो पर्यंत आमच्या भागातील विजपुरवठा सुरळीत होत नाही तो पर्यंत आम्ही कार्यालयातून उठणार नाही असा पवित्रा महीलांनी घेतला होता.
उन्हाळ्याचा उकाडा त्यात महावितरणचा अक्षम्य गोंधळी कारभार नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत होत आहे. लाईट जाण्याचा येण्याची कोणतीही वेळ निश्चित नाही. तांत्रिक बिघाडाच्या नावाखाली विज वितरण कंपनी नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळत आहे. दिवसभर लंपडाव झाला, संध्याकाळीही लाईट न आल्याने मिलिंद नगर भागातील महीलांनी वैतागून काल दि २० एप्रिल रोजी रात्री ८ वाजता जामखेड महावितरणच्या कार्यालयात लहान मुलांनसह धडक जाऊन महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. मात्र एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर आलेल्या या महीलांचे व नागरिकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी महावितरणचा एकही कर्मचारी किंवा अधिकारी महावितरणच्या आवरात उपस्थित नव्हता.
त्यामुळे महीला आनखी संतप्त झाल्या व त्यांनी जामखेड महावितरण कार्यालयाच्या खालील खोलीतच ठीय्या आंदोलन सुरू केले. महावितरण कर्मचारी अहोरात्र काम करतात पण त्यांच्या कामाचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी सक्षम अधिकारीच नाहीत. त्यांचे कोणतेही नियंत्रण नाही. सदर अधिकारी जामखेड येथे हजर नसतात आणि ते कोणाचेही फोन उचलत नाहीत. या गंभीर व अत्यावश्यक विषयावर राजकीय सामाजिक पुढाऱ्यांचे दूर्लक्ष होताना दिसुन येत आहे.
आंदोलना दरम्यान वैतागून घरातुन सरळ लहान मुले, महिला व इतर लोक थेट महावितरण कार्यालयाच्या मागे असणाऱ्या ३३ केव्ही फिडर कडे गेले होते. या दरम्यान कार्यालयात अंधार होता. यामध्ये जर कोणाच्या जीविताला धोका झाला आणि त्यातून काही कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला तर याची जबाबदारी महावितरण घेणार का हा मोठा प्रश्न निर्माण होतो. शहरातील सार्वजनिक संघटना व पुढाऱ्यांनी या घटनेकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे.
या आंदोलनात महीला सुकनाबाई सदाफुले, गंगावणे बाई, बेबी ओव्हळ, लिला कांबळे, अल्का कांबळे, मंगल गायकवाड, राणी पारवे, सारीका गायकवाड, ताराबाई माने, शिल्पा पारवे, प्रमिला गायकवाड, रेखा सदाफुले, वैशाली सदाफुले, अश्विनी पारवे, नंदा शिरोळे, मनिषा माने सह अनेक महीला सहभागी झाल्या होत्या.
आंदोलना दरम्यान भिमटोला सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बापुसाहेब गायकवाड, वंचित बहुजन आघाडीचे जामखेड तालुका अध्यक्ष आतिश पारवे, मनसे उपप्रमुख सनी सदाफुले, वंचितचे शहर अध्यक्ष अजिनाथ शिंदे, सिद्धार्थ पारवे, कुंडल राळेभात, महेश सदाफुले, अक्षय शिरोळे, विशाल समिंदर हे देखील आंदोलना दरम्यान उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here