डॉ. भास्कर मोरेचा कोठडीतील मुक्काम वाढला, उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठातून जामीन अर्ज माघारी
जामखेड प्रतिनिधी
रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जावर निकाल येण्यापूर्वीच मोरे याने जामीन अर्ज माघारी घेतला आहे. यामुळे पुन्हा डॉ भास्कर मोरेचा कोठडीत मुक्काम वाढला आहे.
डॉ. भास्कर मोरे विनयभंगाच्या गुन्ह्यात तुरूंगात आहेत. याबाबत जामखेड न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर सत्र न्यायालयानेही जामीन नाकारला होता. त्यामुळे डॉ भास्कर मोरे याने मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठात जामीन अर्ज केला होता. सदर जामिन अर्जावर १६,१७ व १८ एप्रिल रोजी जोरदार युक्तिवाद झाला होता. सदर जामिन अर्जावर न्यायालयाकडुन आदेश येण्यापूर्वीच मोरे याने जामीन अर्ज माघारी घेतला. मात्र जामीन अर्ज मागे घेतल्यामुळे डॉ मोरेचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे.
उच्च न्यायालयाने केलेल्या आदेशात म्हटले आहे की, चार्जसीट दाखल केल्यानंतर तुम्ही पुन्हा जामखेड न्यायालयात जामिन मांडु शकता. सरकार पक्षाकडून ॲड प्रतिभा भारड यांनी युक्तिवाद केला. तसेच मुळ फीर्यादीच्या वतीने जेष्ठ वकील वसंत साळुंके तसेच ॲड मयुर साळुंके ॲड नितीन तेलगावकर व ॲड अमोल जगताप यांनी युक्तिवाद केला.
रत्नदीप मेडिकल फाउंडेशनचा अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे हा स्रीलंपट प्रवृत्तीचा व समाजविघातक कृती करणारा असून, त्याने केलेला विनयभंगाचा गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा आहे. तसेच, त्याच्याविरुद्ध ४ अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद झालेली आहे. तो अशाच प्रकारचा गुन्हा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच, न्यायालयाने आरोपीस पूर्वीच्या गुन्ह्यात दिलेल्या जामिनाच्या अटी व शर्तीचे वारंवार उल्लघंन करीत आहे. आरोपीला कायद्याचा धाक असल्याचे दिसून येत नाही असा युक्तिवाद सरकारी वकील व मुळ फीर्यादीच्या वतीने करण्यात आला.
मोरे विरुद्ध आतापर्यंत सहा वेगवेगळ्या दखलपात्र गुन्ह्यांची नोंद झालेली आहे. लैंगिक, आर्थिक व शैक्षणिक पिळवणुकीविरूद्ध विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाला पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी सहकार्य केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here