अशिया बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय जामखेडची नोंद.
जामखेड प्रतिनिधी
जगातील सर्वात मोठे मानवी रचनेतील भारताच्या नकाशाची प्रतिकृती रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय जामखेड मध्ये साकार झाली आहे. त्यामुळे नागेश विद्यालयाचे अशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होऊन जामखेड चे नाव जागतिक पातळीवर चमकले आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की 26 जानेवारी 2024 रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सव निमित्त जगातील सर्वात मोठे मानवी रचनेतील भारताच्या नकाशाची प्रतिकृती रयत शिक्षण संस्थेच्या श्री नागेश विद्यालय जामखेड मध्ये साकार झाले आहे. यामध्ये 2500 विद्यार्थी व 17 महाराष्ट्र बटालियनची एनसीसी कॅडेट सहभागी झाले त्याचे मोजमाप लांबी 240 रुंदी 225 फूट आहे. 26 जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यालय परिसरात साकारले कलाशिक्षक तथा एनसीसी ऑफिसर मयूर कृष्णाजी भोसले यांनी ते साकारले.
अशिया बुक ऑफ रेकॉर्डने 19 मार्च 2024 रोजी निश्चित केले आहे. अशी नोंद झाली वर्ल्ड रेकॉर्ड युनिव्हर्सिटी सलग्न अशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे. रेकॉर्डची वैशिष्ट्ये म्हणजे भारताच्या नकाशा मानवी चित्राची लांबी 240 व रुंदी 225 फूट असून क्षेत्रफळ 54000 स्क्वेअर फुट वर्तुळाकार रचनेची त्रिज्या 101 फूट व क्षेत्रफळ 32031 स्क्वेअर फुट आहे या वर्तुळाकार चित्रात विद्यार्थी बैठक रचनेत भव्य भारताचा नकाशा तसेच जय हिंद जय भारत नाव साकारले. 75 वा प्रजासत्तक दिन अमृत महोत्सवाचे निमित्त साधून 75 मीटर तिरंगा विद्यार्थ्यांनी हातात धरून फडकवला आहे.
भारताचा नकाशा मधील विद्यार्थ्यांच्या हातात छोटे राष्ट्रध्वज देण्यात आले. श्री नागेश व कन्या विद्यालय मधील 2500 विद्यार्थी विद्यार्थिनी व 17 महा बटालियन चे नागेश विद्यालयाचे एनसीसी कॅडेट सहभागी झाले. रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य आ रोहित दादा पवार, उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, सहाय्यक विभागीय अधिकारी तोरणे साहेब व नाईकवाडी साहेब, विद्यालयाचे प्राचार्य मडके बी के, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य हरिभाऊ बेलेकर, राजेंद्रजी कोठारी , प्राध्यापक मधुकर (आबा) राळेभात, विनायक राऊत, सुरेश भोसले, प्रकाश सदाफुले, अशोक यादव, अमोल बहिर, 17 महाराष्ट्र बटालीयचे कमांडिंग ऑफिसर कर्नल चेतन गुरुबक्ष, लेफ्टनंट कर्नल रणदीप सिंग आदी मान्यवरांनी अभिनंदन केले.

आशिया खंडातील सर्वात मोठी शैक्षणिक संस्था रयत शिक्षण संस्था सातारा आहे या संस्थेचे श्री नागेश विद्यालय जामखेड ची अशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद केली हे अभिमानाची बाब आहे. अशिया बुक ऑफ रेकॉर्ड प्रमाणपत्र, मेडल गिफ्ट बॉक्स मान्यवरांच्या हस्ते शुक्रवार दिनांक 12 एप्रिल 2024 रोजी सकाळी 8.00वा समारंभात विद्यालयास प्रधान करण्यात येणार आहे. तरी सर्व पालक, विद्यार्थी, ग्रामस्थ जामखेडकरांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे अशी विनंती विद्यालयाचे प्राचार्य मडके बी के यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here