पाच वर्षात फक्त दाळ साखर वाटली पण त्याचे देखील फोटोसेशन केले – निलेश लंके
जामखेड प्रतिनिधी
ज्यांना पाच वर्षांत संसदेत लावले त्यांनी मागिल पाच वर्षापुर्वी फक्त एकदाच आरोग्य शिबिर घेऊन दिखावा केला. निवडुन आले आणि ते जनतेकडे फीरकलेच नाहीत. निवडणुका जवळ आल्या की फक्त दाळ साखर वाटली मात्र त्याचे फक्त फोटोसेशन केले.
महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांची आहील्यानगर (नगर दक्षिण मतदार संघात) स्वाभिमान जनसंवाद यात्रा ही दि ९ एप्रिल रोजी जामखेड तालुक्यात आली होती. यानंतर आ. रोहित पवार व उमेदवार निलेश लंके यांची ही जनसंवाद यात्रा सकाळी खर्डा गावातून स्वराज्य यात्रेचे दर्शन घेऊन तालुक्यातील नायगाव, राजुरी, नान्नज, व जवळा या ठिकाणी नागरिकांशी संवाद साधत रात्री आठ जामखेड शहरात दाखल झाली.
यावेळी कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्रा मधुकर राळेभात, तालुका अध्यक्ष विजयसिंह गोलेकर, दत्तात्रय वारे, राजेंद्र कोठारी, सुर्यकांत (नाना)मोरे, शिवसेनेचे सुरेश भोसले कॉग्रेस पक्षाचे शहाजी राजेभोसले, राहुल उगले, शहाजी (काका) राळेभात, राजेंद्र पवार, रमेश (दादा) आजबे, प्रशांत (काका) राळेभात, संजय वराट, हनुमंत पाटील, अमित जाधव, प्रा.लक्ष्मण ढेपे, आम आदमी पार्टीचे तालुकाधक्ष संतोष नवलाखा, प्रहार चे तालुका अध्यक्ष जयसिंग उगले, भानुदास बोराटे भरत काळे नय्युमभाई शेख, सरपंच सागर कोल्हे, काकासाहेब कोल्हे, कुंडल राळेभात, अमर चाऊस, हरीभाऊ बेलेकर, प्रा विकी घायतडक, वैजनाथ पोले, प्रकाश काळे, भिमराव पाटील, सह तालुक्यातील सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना लोकसभेचे उमेदवार निलेश लंके म्हणाले की ज्या मतदारसंघात आपण निवडून येतो त्या ठीकाणची भौगोलिक परिस्थितीची माहिती आसने महत्त्वाचे आहे. ती परीस्थिती आ. रोहीत पवार यांना माहीत आहे. ज्यांना पाच वर्षांत संसदेत लावले त्यांनी आधी आरोग्य शिबीरे घेतली मात्र पुन्हा ते मतदार संघात कुठेच फीरकले नाहीत. साखर दाळ वाटायचा कार्यक्रम केला तीथे पण फोटोसेशन केले. आमदार व खासदार निवडून आल्यानंतर विकासाचे काम करणे गरजेचे आहे.
विकासाच्या मुद्यावर निवडणुक लढवायला पाहीजे माझी गरीब परीस्थिती आसल्याने लोक मला ओट पण देतात आणि नोट पण देतात कारण माझ्या कडे तुमच्या सारखे जीवाभावाचे लोक आहेत.
तुम्हाला काम करणारा खासदार पाहिजे का इंग्रजी बोलणारा. कारण इंग्रजी बोलणार्‍या खासदाराला पाच वर्षांत स्वतःच्या घराकडे जाणारा नगर मनमाड रस्ता व नगर जामखेड रस्ता सुध्दा करता आला नाही अशी टीका देखील खा.सुजय विखेंनवर लंके यांनी केली. ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. सत्तेचा गैरवापर करुन विरोधकांवर मोदी सरकार ईडीची चौकशी लावत आहे. विरोधकांची पाया खालची वाळु सरकली आहे. पैशाच्या बळावर व सत्तेच्या जोरावर विखेंनी उमेदवारी मिळवली आहे. पण जनता त्यांना धडा शिकवल्या शिवाय रहाणार नाही. सर्वांच्या नादी लागायचे पण पवारांच्या कधी नादी लागायचे नाही असे सुचक वक्तव्य देखील निलेश लंके यांनी केले.
यानंतर आ. रोहित पवार म्हणाले की निलेश लंकेंना इंग्रजी येत नाही हा काय मुद्दा आहे का पण लंकेंना मातृभाषा बोलता येते हे विरोधकांनी लक्षात ठेवावे. मोदी सरकारने कांद्याचे भाव पडले त्या बाबत विखेंनी कुठं आवाज उठवला नाही. ते क्रेंद्रात भांडले का नाहीत, शेतकर्‍यांचे अनुदान, दुधाचे भाव, महागाई यावर देखील केंद्रात का बोलले नाहीत. शेतकर्‍यांच्या योजनांना अटी लागतात पण पार्टी आणि एखाद्याचे कुटुंब फोडताना अटी लागत नाहीत.
कोरोना काळात मी रुग्णांची मोफत सेवा केली आणि मागच्या दाराने आमदार झाले ते आपल्या घरी लॉन ला पाणी मारत होते. लंपी रोग आला त्यावेळी पंधरा टक्क्यावरून शंभर टक्क्यांवर लसीकरण नेले. मोदी गॅरंटी चा फायदा झाला नाही पण पारनेर पेक्षा कर्जत जामखेड मधुन जास्त लीड देण्याची गॅरंटी द्यायची आहे आसे अवहान आ. रोहित पवार यांनी उपस्थित नागरिकांना केले.
राम शिंदे ना विकासाचा मुद्दा कळत नाही विकास कामांना स्थगिती दिली मंदिरांच्या कामांना देखील स्थगिती दिली हे कसलं तुमचं हींन्दुत्व आहे. रडायचे होते ते पलीकडे गेले आणि लढायचे होते अलीकडेच राहिले वनविभागाच्या हद्दीमध्ये एम आय डीसी कशी होणार. एकाच महीन्यात न्यायालया कडुन जुन्या एमआयडीसी ची मंजुरी आणु असा विश्वास आ. रोहित पवार यांनी बोलुन दाखवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here