बापुसाहेब शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल विविध ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार
जामखेड प्रतिनिधी
तालुक्यातील पिंपरखेड येथील सामाजिक कार्यकर्ते व राजकीय नेते अजित (दादा) पवार यांचे खंदे समर्थक बापुसाहेब शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित (दादा) पवार) गटाच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल श्रीगोंदा तालुक्यातील देऊळगाव, तसेच जामखेड तालुक्यातील रत्नापूर ग्रामपंचायत सह अनेक मित्रमंडळ व हितचिंतकांनी शिंदे यांचा जाहीर सत्कार केला आहे.
आज सकाळी देऊळगाव चे सरपंच उपसरपंच ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य यांनी सदिच्छा भेट दिली व शिंदे यांचा जाहीर सत्कार केला व शुभेच्छा दिल्या. यावेळी देऊळगावचे सरपंच शरद गलांडे उपसरपंच संतोष कोठारे ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब बाबर ग्रामपंचायत सदस्य महेश गायकवाड ज्येष्ठ संचालक महादेवराव बाबर यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
तसेच जामखेड तालुक्यातील रत्नापूर ग्रामपंचायत सदस्य अशोक मोरे, सिद्धीविनायक वीट उत्पादक संस्थेचे मालक राजेंद्र शिंगणे, सांगवीचे युवा नेते चरण कदम, रत्नापूर चे अजितदादा गटाचे खंदे समर्थक पांडुरंग ढवळे, संजय कांबळे यांनीही सन्मान केला. जामखेड तालुका उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जामखेड शहरासह ग्रामीण भागात विविध ठिकाणी शिंदे यांचा जाहीर सत्कार करण्यात येत आहे.