जामखेडच्या तरुणाची सायकलवारी निघाली दोन हजार कीलोमिटरवरी
दोन हजार कीलोमिटर प्रवास करत दहा दिवसात पोहचणार हरीद्वारला
जामखेड प्रतिनिधी
जामखेड येथील समीर शेख हे दरवर्षी नवीन वर्षाच्या सुरुवातीला देशातील एक ठिकाण निवडतात व आठ दहा दिवस सायकल वर प्रवास करत पर्यावरण जागृती व व्यायामाचे महत्त्व याचा संदेश देतात. जामखेडच्या समिर शेख या तरुणाची सायकलवारी आता निघाली दोन हजार कीलोमिटरवरी म्हणजे दोन हजार कीलोमिटर प्रवास करत दहा दिवसात तो हरीद्वारला पोहचणार आहे.
समीर शेख यांनी आतापर्यंत 2021, 2022 ला जामखेड ते अजमेर 1110 km चा सायकल प्रवास केला आहे. तसेच गेल्या वर्षी 2023 ला ते जामखेड ते दिल्ली 1670 km चा प्रवास 8 दिवसात पूर्ण केला आहे. तर गतवर्षी ते 2024 ला जामखेड ते हरिद्वार 1980 km प्रवास 10 दिवसात पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे.
सायकलस्वार शेख समीर म्हणाले की, मी दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी सोलो सायकल राईड करत आहे. या वर्षाची पहिली सुरुवात माझी सायकल प्रवास करत चांगले वाईट अनुभव घेत मजेशीर जिवन जगत आहे. तसेच, कसलेही कामाचे तान, तणाव न घेता स्वतः साठी हे वर्षाचे 10 ते 15 दिवस मी जगण्याचा गोड अनुभव या सायकल प्रवासात घेणार आहे. कारण आयुष्यात माणसाने स्वतः साठी जगून घ्यावे शेवटी हा अनुभव खूप सुख देतो हा माझा विचार आहेत , हा सायकल प्रवास माझा 4 था आहे जो मी जामखेड ते हरिद्वार 2000km चा करणार आहे. मला हा प्रवास 10 दिवसात पूर्ण करायचा आहे असा माझा निश्चय आहे.
समीर शेख याच्या प्रवासाचे उद्दिष्ट पर्यावरण जनजागृती, तसेच रोजच्या जीवनात व्यामचे महत्त्व हे लोकांपर्यंत संदेश ह्या माध्यमातून पोहोचवाईचे आहे तसेच त्याचा प्रवासाचा मार्ग जामखेड, आष्टी, कडा नगर, राहुरी, शिर्डी, येवला, मनमाड, मालेगाव, धुळे, शिरपूर, सेंधवा ( मध्यप्रदेश) , धार, रतलाम, जावरा, चितोडगड, भिलवाडा, ( राजस्थान) अजमेर, किशनगड, जयपूर, दारुहेडा, ( हरियाणा ), नोएडा, गुरुग्राम, दिल्ली, मुजफ्फरनगर ( उत्तरप्रदेश) कलियर ( उत्तरांचल) हरिद्वार असा असून माझा हा सायकल प्रवास सात राज्यातून होणार आहे.( महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, हरियाणा, दिल्ली, उत्तरप्रदेश, आणि उत्तरांचल)आशा सात राज्यातून होणार आहे. आपणास हीच विनंती आहे.
सायकल रायडींग समिर शेख यांच्या सोबत मदतीसाठी बाईक रायटर म्हणून जुबेरभाई काझी देखील दरवर्षी प्रमाणे दुचाकीवर जाणार आहेत. प्रवासा दरम्यान मला काही अडचण आली तर मला मदत करावी अशी विनंती समीर याने केली आसुन त्याच्या मोबाईल क्रमांक 808 77 808 41 यावर संपर्क करण्याचे आवाहन त्याने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here