लोकांना मदतीचा हात देऊ शकलो हेच माझे समाधान- आ. प्रा. राम शिंदे

जामखेड प्रतिनिधी

सार्वजनिक जीवनात सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतला त्यामुळे मी मंत्री झाल्यावर लोकांची काय अडचण असते ती मी समजु शकलो. राजकारणात आल्यावर लोकांना मदतीचा हात दिला याचे मला समाधान आहे आसे मत आ.प्रा.राम शिंदे यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने रत्नापूर येथे व्यक्त केले. 

रत्नापूर या ठिकाणी रविवार दि ३१ डिसेंबर रोजी माजी सरपंच दादासाहेब वारे व भाजपा युवा नेते सुहास वारे यांनी आ. प्रा.राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार समारंभ सोहळा आयोजित करण्यात केला होता यावेळी आ. प्रा राम शिंदे बोलत होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सचिन (सर) गायवळ, भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद, कृषी उत्पन्न समितीचे सभापती शरद कार्ले, माजी सभापती डॉ. भगवानराव मुरूमकर, नगरसेवक अमित चिंतामणी, बिभीषण धनवडे, दादासाहेब वारे, रवी सुरवसे, ॲड. प्रविण सानप, बापुराव ढवळे, सदाशिव कवादे, बंकट बारवकर, गोरख घनवट, उद्धव हुलगुंडे, सुहास वारे, बिट्टु मोरे, अल्ताफ शेख, डॉ. गणेश जगताप, तुषार बोथरा, डॉ. प्रशांत वारे, डॉ. अनिल गायकवाड, डॉ. मुळीक, डॉ. प्रदीप कात्रजकर, चित्रांगण वारे, दिंगाबर वारे, चेअरमन आशोक नाना महारनवर, अशोक मोरे, चेअरमन बबनराव ढवळे, संचालक उद्दव ढवळे, राजेंद्र नलवडे, दत्तात्रय वारे, मनोज वारे, उमेश मोरे विकास मोरे, गोरख राजगुरू  सुनिल जाधव सह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना आ. प्रा राम शिंदे म्हणाले की राजकारण करत आसताना गावचा विकास आपल्या भागात आला पाहिजे. काम कोणाचेही असो निस्वार्थ पणाने केलेले काम योग्य आसते. मी दुसर्‍यांन सारखे ढोस देत नाही मात्र जनता जनार्दन हाच माझा ढोस आहे. सार्वजनिक जीवनात सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतला त्यामुळे मी पण मंत्री झाल्यावर लोकांची काय अडचण असते ती मी समजु शकलो व त्यामुळेच मी लोकांची कामे करु शकलो. जामखेडची २५० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना आमचे सरकार आल्यावर मंजुर करुन आणु शकलो, त्यामुळे पुढील ३५ वर्षे जामखेडकरांचा पाणीप्रश्न सुटणार आहे.

जामखेड तालुक्यातील हळगाव येथे ६५ कोटींचे शासकीय महाविद्यालय तसेच कुसडगांव चे भारत बटालियन ट्रेनिंग सेंटर सुरू केले. बाहेरचा गडी कधी जाईल सांगता येत नाही त्यामुळे आपल्या गावातीलच गडी खरा कामाचा आहे. मी कुणाला गाडीतून उतरवत नाही तर गाडीत बसवतो त्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्ते माझ्यावर नाराज होत नाहीत असे देखील आ. प्रा राम शिंदे यांनी व्यक्त केले शेवटी आभार रत्नापूरचे भाजपा युवा नेते सुहास वारे यांनी आभार मानले. 

चौकट

वाढदिवसा दिवशी दुसर्‍या सारखे फॉरेनला जात नाही.

कर्जत जामखेड मध्ये माझा वाढदिवस साजरा होत आहे तो वाढदिवस माझ्यावर प्रेम करणार्‍या लोकांनी होतात घेतला आहे. वाढदिवसाच्या दिवशी मी बायका पोरं घेऊन फॉरेनला जात नाही मी वाढदिवसाच्या दिवशी लोकांनमध्ये मिसळुन लोकांचे प्रश्न व अडीअडचणी सोडवतो असा देखील टोला आ. प्रा राम शिंदे यांनी नाव न घेता आ. रोहित पवार यांना लावला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here