आमदार प्रा राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त देवदैठण येथे आयोजित केलेल्या शिबिरात ११७ रुग्णांनी घेतला लाभ
डॉ. संजय भोरे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित केले होते मोफत आरोग्य शिबीर
जामखेड प्रतिनिधी
आ. राम शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त, देवदैठण येथे डॉ. संजय भोरे मित्र परिवाराने आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबीरात ११७ रुग्णांनी तपासणी करून या शिबिराचा लाभ घेतला.
भाजपा नेते, माजी मंत्री आ. प्रा.राम राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील देवदैठण येथील डॉ. संजय भोरे मित्र मंडळाच्या वतीने आज दि. ३१ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते ११ वाजताचे दरम्यान मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा देवदैठण व परिसरातील ११७ रूग्णांनी लाभ घेतला. यामध्ये रक्तदाब, सांधेदुखी यासारख्या व्याधी तपासणी केली व औषधोपचार करून आरोग्य विषयक मार्गदर्शन केले.
जामखेड येथील सनराईज एज्युकेशन फौंडेशनचे अध्यक्ष व प्रयत्न हाॅस्पिटलचे संचालक डॉ. संजय भोरे यांनी सर्व रुग्णांची मोफत तपासणी व मोफत औषधोपचार केले या शिबीरात रक्तदाब व सांधेदुखी चे ८०℅ रूग्ण आढळून आले त्यातील ९०℅ रूग्णांना आपणास रक्तदाब आहे हे माहीत नव्हते.
डॉ. संजय भोरे हे सन १९९२ पासून म्हणजे ३१ वर्षांपासून आरोग्य सेवेत कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या प्रयत्न हाॅस्पिटल मार्फत आरोग्य शिबिराच्या माध्यमातून अनेक वर्षापासून सर्व सामान्य नागरिकांच्या आरोग्य विषयक समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करतात. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य तपासणी तसेच मोफत औषधोपचार देत आहेत. याबरोबरच सामाजिक काम म्हणून माजीमंत्री आ. प्रा.राम शिंदे यांच्या माध्यमातून देवदैठण व पंचक्रोशीतील शेतकरी व सर्व सामान नागरीकांची अनेक वैयक्तिक व सार्वजनिक कामे करत असतात.