आ. प्रा. राम शिंदेच्या वाढदिवसानिमित्त समर्थ हॉस्पिटल तर्फे मोफत रोग निदान व मोफत औषधोपचार शिबीर.
भाजपा सरचिटणीस लहु शिंदे व आंकुश शिंदे यांनी केले शिबिराचे आयोजन.
जामखेड प्रतिनिधी
जामखेड येथिल समर्थ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या वतीने आ. प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध आजारांच्या निदानाकरिता मोफत आरोग्य निदान व मोफत औषधोपचार शिबीराचे आयोजन आरणगाव येथिल भाजपा सरचिटणीस लहु शिंदे व आंकुश शिंदे यांनी केले आहे. या शिबिरात जास्तीत जास्त गरजु रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सोमवार (१ जानेवारी) सकाळी ९ ते १२ या वेळेत आरणगाव येथिल ग्रामपंचायत कार्यालयालया समोर हे शिबीर होणार आहे. या शिबिरात गुडघेदुखी, पाठदुखी, मणक्याचे आजार, मानदुखी, अपेंडिक्स, हर्निया, मुळव्याध भगंदर, मुतखडा, प्रोस्टेट, संधिवात, आमवात, मधुमेह, रक्तदाब, अर्धांगवायु व सर्व प्रकारचे त्वचाविकार या आजारांच्या तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत. मात्र तपासणीसाठी येतेना सर्व रुग्णांनी आपले जुने रीपोर्ट सोबत घेऊन येण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
शिबीरात समर्थ हॉस्पिटल चे प्रसिद्ध. हृदयरोग व मधुमेह तज्ञ डॉक्टर अमोल भगत हाडांचे तज्ञ श्रीनिवास लांब (नागरगोजे) मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. भरत दारकुंडे हे रुग्णांची तपासणी करणार आहेत. या शिबिरात नावनोंदणीसाठी सुनिल मोरे मो. 7057900503 यांच्याशी संपर्क करवा तसेच आरणगाव सह तालुक्यातील जास्तीत जास्त गरजु रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा आसे अवहान शिबिराचे आयोजक व भाजपा सरचिटणीस लहु शिंदे व आंकुश शिंदे यांनी केले आहे.