आ. राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीर , डॉ. संजय भोरे मित्र परिवाराने केले आयोजन
जामखेड प्रतिनिधी
भाजपा नेते, माजी मंत्री आ. प्रा.राम राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील देवदैठण येथील डॉ. संजय भोरे मित्र मंडळाच्या वतीनेदि. ३१ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते ११ वाजताचे दरम्यान मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले असुन पंचक्रोशीतील नागरिकांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन जामखेड येथील सनराईज एज्युकेशन फौंडेशनचे अध्यक्ष व प्रयत्न हाॅस्पिटलचे संचालक डॉ. संजय भोरे यांनी केले आहे.
माजीमंत्री आ. राम शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त तालुक्यातील विविध ठिकाणी सामाजिक, सांस्कृतिक तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या निमित्ताने तालुक्यातही देवदैठण येथेही मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी पंचक्रोशीतील नागरिकांनी या शिबीराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. संजय भोरे मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
डॉ. संजय भोरे हे सन १९९२ पासून म्हणजे ३१ वर्षांपासून आरोग्य सेवेत कार्यरत आहेत. त्यांनी आपल्या प्रयत्न हाॅस्पिटल मार्फत आरोग्य शिबिराच्या माध्यमातून अनेक वर्षापासून सर्व सामान्य नागरिकांच्या आरोग्य विषयक समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करतात. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य तपासणी तसेच मोफत औषधोपचार देत आहेत.
याबरोबरच सामाजिक काम म्हणून माजीमंत्री आ. प्रा. राम शिंदे यांच्या माध्यमातून देवदैठण व पंचक्रोशीतील शेतकरी व सर्व सामान नागरीकांची अनेक वैयक्तिक व सार्वजनिक कामे करत असतात.