पंधरा वर्षांपासून रखडलेल्या नवीन कृषी उत्पन्न बाजार समितीकडे जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न लागला मार्गी

जामखेड ते लेहनेवाडी शिवरस्ता खुला करण्याचे काम सुरू, आ. राम शिंदे यांनी केली रस्त्याची पहाणी 

जामखेड प्रतिनिधी
नवीन कृषी उत्पन्न बाजार समितीकडे जाणार्‍या जामखेड ते लेहनेवाडी हा शिवरस्ता गेल्या पंधरा वर्षांपासून रस्त्याआभावी रखडला होता. आता रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला आसुन याठिकाणी लवकरच सुसज्ज रस्ता व भव्य कांदा, लिंबू मार्केट उभे राहणार आसल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पै शरद कार्ले व उपसभापती कैलास वराट सर यांनी दिली. या रस्त्याची पहाणी नुकतीच आमदार प्रा. राम शिंदे यांनी केली आहे.
कृषि उत्पन्न बाजार समिती जामखेड यांनी मार्केट यार्ड करिता १५ वर्षा पूर्वी १५ एकर जागा घेऊन ठेवली होती. मात्र या जागेकडे जाण्यासाठी रस्ता नव्हता त्यामुळे ही जागा कीत्येक वर्षे पडीक म्हणून पडुन होती. या रस्त्याची अडचण लक्षात येताच नवनिर्वाचीत सभापती पै.शरद दादा कार्ले व उपसभापती कैलास वराट सर यांच्या सह सर्व संचालक मंडळ यांनी रस्ता खुला होण्यासाठी प्रयत्न केले. जामखेड ते लेहनेवाडी शिवरस्ता खुला करणेकामी तहसीलदार योगेश चंद्रे जामखेड यांच्या कडे पाठपुरावा करून सदर जागेच्या बाजूच्या सर्व दहा गटांची मोजणी करून रस्ता खुला करण्यात आला. सदर बाजार समितीच्या १५ एकर जागेमध्ये कांदा मार्केट , लिंबू मार्केट तसेच वेअर हाऊस, कोल्ड स्टोरेज, सेल हॉल इ. सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या प्रसंगी आमदार प्रा.राम शिंदे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पै. शरद दादा कार्ले, उपसभापती कैलास वराट, मा.तहसीलदार योगेश चंद्रे साहेब, ‌सर्कल माने साहेब, संचालक गौतम (अण्णा) उतेकर, नंदकुमार आबा गोरे, विष्णू आबा भोंडवे, डॉ. गणेश जगताप डॉ. सिताराम ससाने रवींद्र हुलगुंडे, पं. स. मा. सभापती डॉ. भगवान मुरूमकर, जि.प सदस्य श्री. सोमनाथ पाचरणे, केशव , नगरसेवक अमित चिंतामणी, अ‌ॅड. प्रवीण सानप, लहू शिदे, चौगुले व ज्या शेतकरी बांधवांनी रस्त्यासाठी जमीन मोकळी करून दिली असे चंद्रकांत राळेभात, अरुण, राजेंद्र राळेभात, अंबादास राळेभात, दिनेश जगताप, संजय खेत्रे, दादासाहेब मगर, प्रवीण राळेभात व अण्णासाहेब मगर तसेच संबंधित शेतकरी बांधव व श्री सय्यद वाहेद सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती जामखेड या प्रसंगी उपस्थित होते.
तसेच या शिवरस्त्याला नुकतीच आमदार प्रा. राम शिंदे यांनी भेट दिली आसुन मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून २.५० किमी रस्ता करण्याचे घोषित केले यामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे. पुढच्या काळामधे जामखेड तालुक्यातील शेतकर्‍यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी व योग्य भाव मिळवून देण्यासाठी बाजारसमिती च्या माध्यमातून सर्व प्रयत्न केले जातील अशी असे अवहान सभापती पै. शरद कार्ले यांनी शेतकर्‍यांना केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here