राज्यस्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धेसाठी श्री शंभुसुर्य मल्लखांब प्रशिक्षण संस्थेच्या खेळाडूंची निवड
जामखेड प्रतिनिधी
विभागस्तस्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धेत जामखेडच्या श्री शंभुसुर्य मल्लखांब प्रशिक्षण संस्थेच्या खेळाडूंची निवड दिनांक २९ ते ३१ डिसेंबर रोजी उदगीर तालुका क्रीडा संकुल येथे होणाऱ्या शालेय राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
पुणे विभागामार्फत टेंभुर्णी (जिल्हा सोलापूर) याठिकाणी घेण्यात आलेल्या शालेय विभागस्तरीय मल्लखांब स्पर्धेत जामखेड येथील कु. स्नेहल दत्तात्रय भोसले प्रथम क्रमांक , कु. वैष्णवी रामहरी डोके हिने चतुर्थ क्रमांक पटकावला.
छत्रपती संभाजीनगर विभागामार्फत खरपुडी (जिल्हा जालना) याठिकाणी झालेल्या शालेय विभागस्तरीय मल्लखांब स्पर्धेत श्री शंभुसुर्य मल्लखांब प्रशिक्षण संस्थेच्या मातकुळी( ता. आष्टी) येथील कु.ज्ञानेश्वरी नितिन धनवे, कु.प्रतिक्षा पंढरीनाथ डोके, कु.रेणुका चंद्रकांत डोके, राजेश रामहरी डोळे, विशाल काकासाहेब डोके यांनी चमकदार कामगिरी केली. वरील सर्व विद्यार्थ्यांची दिनांक २९ ते ३१ डिसेंबर २०२३ रोजी तालुका क्रीडा संकुल उदगीर जिल्हा लातुर याठिकाणी होणाऱ्या शालेय राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
खेळाडूंना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तसेच प्रशिक्षक गुरुवर्य बबलु (वस्ताद) टेकाळे, मार्गदर्शक गुरुवर्य प्रशिक्षक होनाजी गोडळकर सर, प्रशिक्षक निलेश कुलकर्णी सर, प्रशिक्षक अमित जिनसीवाले सर, प्रशिक्षक गणेश माने, प्रशिक्षक रोनित खुपसे यांचे मार्गदर्शन लाभले तर संस्थेचे उपाध्यक्ष राजु भांबे, सचिव अमोल निमोणकर, तसेच अहमदनगर जिल्हा व जामखेड तालुका मल्लखांब असोसिएशनच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.








