जैन श्रावक संघ व सकल जैन समाजाच्या विनंतीनुसार जामखेडमध्ये २०२४ चातुर्मास
जामखेड प्रतिनिधी
आचार्य राष्ट्रसंत आनंद ऋषीजी महाराज साहेब यांच्या पावनभूमी मिरी तालुका पाथर्डी या ठिकाणी दीक्षा जयंती महोत्सव निमित्त दि २४ डीसेंबर २०२३ रोजी कार्यक्रम पार पडला. सदरील कार्यक्रमांमध्ये जामखेड येथे सन २०२४ चातुर्मास करण्यासाठी श्री वर्धमान स्थानक वासी जैन श्रावक संघ व सकल जैन समाज जामखेड मधील सर्व श्रावक, श्राविका, ज्येष्ठ, युवा सर्वांनी जामखेड ते मिरी संघ यात्रा काढून महाराज साहेबांच्या २०२४ चातुर्मास जामखेड मध्ये व्हावा यासाठी विनंती केली.
परमपूज्य सुनंदाजी महाराज साहेब व उपाध्याय प्रवर प्रविण ऋषीजी मा.सा.यांच्या आज्ञेने ठाणा ५ यांनी २०२४ या साला मध्ये जामखेड मध्ये चातुर्मास करण्याची विनंतीला मान देऊन त्वरित वर्तमान राष्ट्रसंत आचार्य शिवमुनीजी महाराज साहेब यांच्या परवानगीने व महाराष्ट्र प्रवर्तक कुंदन ऋषीजी महाराज साहेब यांच्या आशीर्वादाने सन २०२४ साठी चातुर्मास जाहीर केला.
यावेळी उपस्थित श्री वर्धमान स्थानक वासी श्रावक संघाचे श्रावक संघाचे अध्यक्ष- दिलीप गुगळे, उपाध्यक्ष- महावीर बाफना, संतोष फिरोदिया, मंगेश बेदमुथा, संजय गांधी, सुंमतीलाल बोथरा, काका भळगट, जवाहरलाल गुदेचा, महेंद्र बोरा, पवन कांकरिया, संदीप भंडारी, चंदुशेठ बेदमुथा, कांतीलाल बोथरा, प्रवीण गादिया, प्रशांत बेदमुथा, सकल जैन समाजातील महिला मंडळ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. ही बातमी कळताच जामखेड आनंदाचे वातावरण तयार झाले व सर्वांनी स्वागत केले.