जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाच्या कामात सुधारणा झाली नाही तर काम बंद पाडु -प्रा .मधुकर राळेभात
लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे.
जामखेड प्रतिनिधी
जामखेड सौताडा या राष्ट्रीय महामार्गाच्या चाललेल्या निकृष्ट कामात जर बदल झाला नाही तर येणार्‍या काही दिवसात रस्त्यावर उतरून काम बंद पाडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्रा मधुकर राळेभात यांनी उपोषण सोडते वेळी दिला आहे. तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या लेखी अश्वासनानंतर सदरचे उपोषण मागे घेण्यात आले.
प्रा मधुकर राळेभात यांच्या समवेत नगरसेवक अमित जाधव, जेष्ठ नेते वैजीनाथ पोले, जिल्हा सरचिटणीस प्रा. राजेंद्र पवार, पारनेर सैनिक बँक संचालक दत्तात्रय सोले, नानासाहेब आढाव हे उपोषणस बसले होते.
जामखेड ते सौतडा राष्ट्रीय महामार्गाचे काम अनेक महिन्यांपासून सुरू असून हे काम फार संथगतीने सुरू आहे .हे कामाची गती व दर्जाबाबत संबंधित ठेकेदार कंपनीचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
रस्ता कामाच्या अनियमिततेमुळे या रस्त्यावरुन जाणारे वाहनधारक, रस्त्याच्या कडेवरील व्यवसायिक व सर्वसामान्य नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या समस्यांमधून जामखेडकरांची सुटका व्हावी व रस्त्याचे काम जलद व योग्य रितीने व्हावे यासाठी प्रा. मधुकर राळेभात यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तहसीलदार कार्यालया समोर उपोषण सुरू केले होते. या अंदोलनास सर्व स्तरांतून पाठिंबा मिळाला आहे.

शहरातील रस्ताचे काम वेगाने करण्यात यावे, कामाचा दर्जा सुधारण्यात यावा, गटार काम नागमोडी न करता सरळ रेशत करावी, धुळ कमी होण्यासाठी रस्तावर नियमित पाणी मारण्यात यावे, गटर पाईप व कॉक्रीटचा दर्जा चांगला Plan & Profile नुसार असावा, सिमेंट कॉक्रीटचा, खडीचा व मुरूमाचा दर्जा सुधारावा, रस्त्यावरील पोल ११ मीटर उंचीचे व सरळ रेषेत लावण्यात यावे, कामगाराच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या ठेकेदार, प्रोजक्ट डायरेक्टर, प्रोजक्ट मॅनेजर व शासकीय अधिकारी यांचे वर सदोश मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व मयत कामगाराचा वारसांना मोबदला देण्यात यावा अशा मागण्यांसाठी हे उपोषण करण्यात येत असल्याचे प्रा. मधुकर राळेभात यांनी यावेळी सांगितले.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश भोसले, प्राचार्य विकी घायतडक, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र पवार, नगरसेवक मोहन पवार, रमेश (दादा) आजबे, कीसनराव ढवळे, प्रकाश सदाफुले, अवदुत पवार, प्रशांत राळेभात, ॲड हर्षल डोके, कुंडल राळेभात, बिलाल शेख, यांनी देखील उपोषणास्थळी भेट देऊन पाठींबा दिला यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे कर्मचारी देखील उपोषणस्थळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here