डॉ. युवराज खराडे यांच्या युग लाॅन्सचे आ. सुरेश धस यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न
जामखेड प्रतिनिधी
जुन्या रूढी परंपरेमधील विवाह व आताचे लग्न पध्दतीत अमुलाग्र बदल झाला असून लग्न समारंभातील मंगलमय वातावरण नामशेष होत की, काय अशी भिती निर्माण झाली असून धावपळीच्या युगात काही बदल होणेही गरजेचेही आहे. माञ समाजाला रूचतील, पचतील आणि आवडतील असेच विवाहसोहळे साजरा करण्याचे आवाहन माजीमंत्री तथा विधानपरिषद सदस्य आमदार सुरेश आण्णा धस यांनी केले.
आष्टी तालुक्यातील आष्टा फाटा येथे सामाजिक कार्यकर्ते तथा ज्या व्यक्तीमध्ये दिन दुबळयांना पंढरीचा पांडूरंग दिसतो असे डॉ. युवराज खराडे व डॉ शितलताई खराडे यांच्या संकल्पनेतून ना नफा ना तोटा या धर्तीवर युग मंगलकार्यालयाचे उद्घाटन माजीमंत्री तथा आमदार सुरेश धस यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. यावेळी आमदार सुरेश धस यांनी मत व्यक्त करून समाजाला आवाहन केले.
यावेळी कार्यक्रमाला मधुकर राळेभात, माजी उपआयुक्त महाराष्ट्र शासन पोपटराव गोरे, माजी आमदार साहेबराव दरेकर, डॉ चंद्रकांत मोरे, जामखेड मा. सभापती भगवान मुरूमकर, बद्रीनाथ जगताप, सरपंच बबन डोके, चिंचपूर सरपंच सतिश ढवळे, सरपंच नानासाहेब बांगर, गणेश माळवे, सरपंच अंगद शिंदे, सरपंच विकास पांढरे, सरपंच तुकाराम गिते, सुधीर पठाडे, सरपंच परिवंत गायकवाड, सरपंच श्रीमती छाया गायकवाड, युवानेते संतोष डोके पाटील, भागवत डोके, एकनाथ खराडे, शेषराव आढाव, हरिदास सातपुते,प्रवीण कात्रजकर, विकास जरे, अभिषेक खराडे, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ समुद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाला संबोधीत करताना मधुकर (आबा) राळेभात म्हणाले की, आजपर्यंत डॉ. युवराज खराडे व डॉ शितलताई खराडे यांनी अल्पदरात रूग्णांची सेवा करून हजारो लोकांचे आशिर्वाद घेतले तसेच मंगल कार्यालयाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेची सेवा करून आशिर्वाद घेण्याचे आवाहन केले यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. युवराज खराडे यांनी केले तर कार्यक्रमासाठी आलेल्या मान्यवरांचे स्वागत व आभार डॉ. शितलताई खराडे व राजू खराडे यांनी मानले.