विजेच्या प्रश्नाबाबत माजी सभापती अंकुश ढवळे शेतकऱ्यांसह करणार अमरण उपोषण…
जामखेड प्रतिनिधी
शेतकर्याच्या शेतीपंपासाठी दररोज ८ तास विद्युत प्रवाह मिळावा म्हणून सातत्याने मागणी करुन देखील विजेचा लपंडाव सुरूच आहे. यासाठी जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती अंकुशराव ढवळे यांनी परिसरातील विजेचा छळ थांबविण्यासाठी शेतकऱ्यांसह अमरण उपोषणाचा इशारा दिला. या बाबत चे निवेदन जामखेड चे तहसीलदार यांना देण्यात आले आहे.
गेली दहा वर्षांपासून पिंपरखेड, हाळगाव, आधी, चोंडी, कवडगाव, गिरवली, अरणगाव, पारेवाडी, डोणगाव, भवरवाडी, पाटोदा, खामगाव, धानोरा, बंजारवाडी, सांगवी, हसनाबाद येथील शेतकरी दररोज ८ तास विद्युत प्रवाह मिळावा म्हणून सातत्याने मागणी करीत आहेत, परंतु दररोज सिंगल फेज व शेती पंपाची वीज मिळत नाही.