Home महिला जगत अनाथ मुलगी व महीलेवर मोफत उपचार करुन सहारा हॉस्पिटलने दिला दोघींना सहारा

अनाथ मुलगी व महीलेवर मोफत उपचार करुन सहारा हॉस्पिटलने दिला दोघींना सहारा

अनाथ मुलगी व महीलेवर मोफत उपचार करुन सहारा हॉस्पिटलने दिला दोघींना सहारा
डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून काढली अर्धा किलोची गाठ
जामखेड प्रतिनिधी
डॉक्टरांना पृथ्वीवरचा देव म्हटले जाते ते उगाच नाही. एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी अथवा मदतीसाठी धावणार्‍या व्यक्तीला देवदूत संबोधले जाते या धर्तीवर रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानणारे जामखेड येथिल सहारा हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी जामखेड येथिल निवारा बालगृहातील एका अनाथ मुलीवर व एका निराधार महीलेवर मोफत शस्त्रक्रिया करून महीलेच्या हातावर शस्त्रक्रिया करून अर्धा कीलोची गाठ काढली आहे.
निवारा बालगृह मोहा फाटा (समता भूमी) ता.जामखेड जि.अहमदनगर येथे इयत्ता 3 री मध्ये शिक्षण घेत असणारी अनाथ मीनाक्षी हिच्या डोक्याला जखम झाली होती. खूप वेळा हॉस्पिटला जाऊन उपचार केले. पण जखम बरी होत नव्हती तसेच बालगृहातील 85 मुलांना दररोज आईप्रमाणे स्वयंपाक करणारी निराधार पायल (ताई) हिच्या डाव्या हाताच्या बाजूला चरबीची मोठी गाठ होती त्या गाठीमुळे तिला भयंकर त्रास होत होता त्यांचे ऑपरेशन करणे खूप गरजेचे होते.
यासाठी निवारा बालगृहातील या दोघींना रामेश्वर हॉस्पिटल येथिल डॉ सचिन काकडे यांच्याकडे तपासणीसाठी आणण्यात आले यावेऴी त्यांनी अजाराचे गांभीर्य ओळखून दोघींना जामखेड येथिल सहारा हॉस्पिटलच्या मदतीने ऑपरेशन करण्याचे ठरले. या अनाथ मीनाक्षी व निराधार पायल (ताई) यांची सर्व परिस्थिती डॉक्टरांनी समजून घेऊन दि 5 सप्टेंबर रोजी जामखेड येथिल सहारा हॉस्पिटलचे सर्व पदाधिकारी यामध्ये डॉ. सचिन काकडे (रामेश्वर हॉस्पिटल संचालक) डॉ.सुनील हजारे (स्री रोग तज्ञ), डॉ.चंद्रकांत मोरे (सोनोग्राफी तज्ञ) डॉ.मनोजकुमार शिंदे (भूल तज्ञ) डॉ. आनंद लोंढे मा (M.D), डॉ. दादासाहेब सावंत, जयसिंग उगले (प्रहार संघटना जि.उपाध्यक्ष) यांच्या मदतीने या अनाथ मीनाक्षी व निराधार पायल (ताई) यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली.
या वेळी डॉ सचिन काकडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की आपल्या कमवलेल्या संपत्तीचा हिसा अनाथ, निराधार, कष्टकरी गोरगरिबांसाठी, समाजाचे आपण देणे लागत असतो, म्हणून गरजु रुग्णांना प्रत्येकाने मदत केली पाहिजे. आलेल्या रुग्णांचे अनाथ, निराधारांच्या, गोरगरीबांचे, ॲड.डॉ. अरुण (आबा) जाधव हे कैवारी आहेत. त्यांची तळमळ आमच्या मनाला भासली त्यामुळे आम्हाला वाटले की आम्ही त्यामध्ये सहकार्य करावे म्हणून स्वतःला सहभागी करून व टीमला सहभागी करून अनाथ मीनाक्षी व निराधार पायल ताई यांचे ऑपरेशन मोफत केले.
इतर हॉस्पिटलला या ऑपरेशनसाठी चाळीस हजार रुपयांचा खर्च आला असता पण आमच्या सहारा हॉस्पिटलच्या व आय.सी.यु टीमला वाटले की हॉस्पिटलच्या नावा प्रमाणे अनाथ निराधारांना सहारा दिला पाहिजे याच अनुशंगाने निवारा बालगृहातील अनाथ मीनाक्षी व पायल ताई यांचे ऑपरेशन मोफत करून आधार दिला.
यावेळी ॲड.डॉ.अरुण (आबा) जाधव (ग्रामीण विकास केंद्र संस्थापक अध्यक्ष) संतोष चव्हाण (निवारा बालगृह व्यवस्थापक) यांचा सहारा हॉस्पिटलच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी सहारा हॉस्पिटलचे सर्व स्टाप, दत्तात्रय लोखंडे, राजू दाणी, राहुल पवार, महेंद्रसिंग पावरा, कविता मते, गोपाळ पावरा, बालाजी आजबे, तुकाराम शिंदे, ऋषिकेश गायकवाड,सुरेखा चव्हाण आदी उपस्थित होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!