जामखेड मध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न
जामखेड प्रतिनिधी
श्री शिवराज्याभिषेक उत्सव समिती जामखेड तालुका यांच्या वतीने दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आपली परंपरा जपण्यासाठी श्री शिवराज्याभिषेक उत्सव समिती मार्फत विविध कार्यक्रम घेण्यात येत असतात हे वर्ष सातवे वर्ष असून मोठ्या उत्साहामध्ये हजारो नागरिकांच्या साक्षीने दहीहंडी उत्सव संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात बालश्रीकृष्ण प्रतिमा पूजन करून करण्यात आले. यावेळी बालगोपाळ व तरुणांनी गोविंदाच्या गाण्यावर ठेका धरून नृत्य केले. यामध्ये छत्रपती श्री शिवाजीनगर पथक जामखेड, शंभुराजे कुस्ती संकुल पथक व मावळा पथक शिवनेरी अॅकेडमी जामखेड या गोविंदा पथकाने सहभाग घेऊन मानाची सलामी दिली.
यावेळी दहीहंडी फोडण्याचा मान शंभुराजे कुस्ती पथक जामखेड यांनी पटकावला. प्रथम क्रमांक मिळवला. यावेळी श्री शिवप्रतिष्ठानचे तालुका अध्यक्ष पांडुरंग भोसले यावेळी बोलतांना म्हणाले आपली संस्कृती वारसा जपण हे आपलं कर्तव्य आहे अनेक उत्सव काळाच्या ओघात मागे पडत आहेत आपले सण उत्सव हे कुठल्याही देशाला लाभले नाही फक्त भारतातच उत्सव यात्रा सणवार साजरे केले जातात यामाध्यमातून आपणं आपली भारतीय संस्कृती जतन करुया असे मनोगत व्यक्त केले यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिक शिवभक्त उपस्थित होते.