मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जामखेडमध्ये रविवारी चक्काजाम आंदोलन
समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – मंगेश (दादा) आजबे
जामखेड प्रतिनिधी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे आंदोलन करत आहेत. याला पाठिंबा देण्यासाठी जामखेडमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने रविवारी सकाळी अकरा वाजता खर्डा चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. तरी समाजबांधवांनी आपल्या हक्काच्या लढाईसाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने मंगेश (दादा) आजबे यांनी केले आहे.
गेल्या दिवसांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे आंदोलन करत आहेत. लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू असतानाच पोलिसांकडून आंदोलन कर्त्यांवर लाठीहल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमठू लागले आहेत. आता याच अनुषंगाने जामखेड शहरात रविवार दि. १० सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी अकरा वाजता खर्डा चौक याठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे तरी या आंदोलनासाठी तालुक्यातील मराठा समाजाच्या बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने मंगेश (दादा) आजबे यांनी केले आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्यात लोकशाही मार्गाने लाखोंच्या संख्येने ५८ मोर्चे निघाले तरीही कोणत्याही सरकारला याचे देणेघेणे नाही. यामुळे मराठा समाजाची शैक्षणिक हानी झाली आहे. पुर्णतः समाज शेतीवर अवलंबून आहे यातच
निसर्गाच्या अवकृपा होत आहे. यामुळे समाज आर्थिक गर्तेत सापडला आहे. सुशिक्षित युवकांना आरक्षण नसल्याने नोकरीची संधी मिळाली नाही. यामुळे मराठा आर्थिक मगासलेपणाच्या गर्तेत गेला आहे. याच पार्श्वभूमीवर समाज आरक्षणासाठी आता पुन्हा रस्त्यावर उतरत आहे. काहीही झाले तरी जो पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळात नाही तो पर्यंत आता मराठा समाज शांत बसणार नाही. तसेच आरक्षण मिळे पर्यंत वेळोवेळी आंदोलन करण्यात येणार आसल्याची माहिती सकल मराठा समाजाचे वतीने मंगेश (दादा) आजबे यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here