रोखठोक जामखेड….

पत्रकाराच्या संदर्भात जामखेड येथील एका कार्यक्रमात औरंगाबाद जिल्ह्य़ातील पाटोदा येथील भास्करराव पेरे यांनी पत्रकारांन बाबत अर्वाच्य भाषेत वक्तव्य करून तमाम पत्रकारांच्या भावना दुखावल्याने त्यांचा जामखेड येथील पत्रकारांच्या वतीने जाहीर निषेध करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.

जामखेड येथील ग्रामीण विकास केद्र संचालीत निवारा बालगृह या शाळेचा वार्षिक निवारा महोत्सव कार्यक्रम नुकताच झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणुन आदर्श माजी सरपंच भास्कर पेरे यांना निमंत्रीत करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या व्याख्यानातुन पेरे बोलत असताना त्यांची जीभ चांगलीच घसरली. अनेक वर्षे एकहाती सत्ता असलेल्या आदर्श गाव पाटोदा ता. जि. औरंगाबाद ग्रामपंचायत मध्ये भास्करराव पेरे पाटील यांच्या मुलीचा पराभव झाला यामध्ये त्यांचे मनोधैर्य खच्ची झालेले आहे. यामुळे त्यांनी जामखेड येेेथील ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृह आयोजित कार्यक्रमात पत्रकारांवर गलिच्छ भाषेत टीका केली असुन अर्वाच्च भाषेत पत्रकाराना अपमानित केले त्यामुळे जामखेड तालुक्यातील सर्व पत्रकाराने भास्कर पेरे यांचा जाहिर निषेध करून तहसीलदार विशाल नाईकवाडे व पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना निषेधाचे निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली.

यावेळी निवेदन देताना नासीर पठाण, अशोक निमोणकर, मिठूलाल नवलाखा, अविनाश बोधले, नंदू परदेशी, मोहीद्दीन तांबोळी, समीर शेख, अशोक वीर, ओंकार दळवी, प्रकाश खंडागळे, फारूक शेख, अजय अवसरे, पप्पू सय्यद, किरण रेडे, धनराज पवार, रोहित राजगूरू यांच्या सह अनेक पत्रकार उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here