रोखठोक जामखेड
मल्लविद्या संस्कार फाऊंडेशन जामखेड तर्फे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय मॅराथॉन स्पर्धेत महीला गटात परभणी च्या अश्विनी जाधव तर पुरुष गटात देखील परभणी च्या किरण म्हात्रे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
कार्यक्रमाचे उद्घाटन बारामती अॅग्रोच्या अध्यक्षा. सौ सुनंदाताई पवार यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात युवा मशाल ज्योत पेटवून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी सौ सुनंदाताई पवार, राजेंद्र कोठारी, प्रा मधुकर राळेभात, मराठा गौरव, युवराज काशीद, नगराध्यक्ष निखिल घायतडक, सभापती सूर्यकांत मोरे, दत्ताभाऊ वारे, अजय दादा काशीद, रमेश आजबे, शहाजीराजे भोसले, प्रदीप टापरे, संजय काशीद, निलंगे सर, तहसीलदार विशाल नाईकवाडे, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, प्रा डॉ पी.जी धनवे, मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते, सुभाष अण्णा लोळगे, डॉ. दमन काशीद, डॉ सुहास सुर्यवंशी, नगरसेवक दिगंबर चव्हाण, मोहन पवार, हनुमंत जाधव, संतोष पवार, प्रा हरिभाऊ ढवळे, प्रा श्रीकांत होशिंग, प्रा सुभाष फाळके, गुलाब शेठ जांभळे, दत्तात्रय ढाळे, महादेव साळुंके, फिरोज बागवान, एस एस पवार, बी एस शिंदे , अमोल गिरमे, रावसाहेब जाधव, लक्ष्मण भोरे, नारायण राऊत, संदीप बोराटे, रमेश बोलभट, मयुर भोसले, प्रल्हाद साळुंके, किशोर सातपुते व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
या स्पर्धेत पाचशे च्या वर धावपटूंनी सहभाग घेतला यात प्रामुख्याने पुणे, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, परभणी, जळगाव , नाशिक या जिल्ह्यातील खेळाडूंची संख्या जास्त होती.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे – आठ किलोमीटर महिला प्रथम क्रमांक अश्विनी जाधव, परभणी, द्वितीय क्रमांक, विशाखा बास्कर, अहमदनगर, तृतीय क्रमांक, जयश्री मालवंडे, चतुर्थ क्रमांक सुप्रिया पोळेकर, व पाचवा क्रमांक बर्डे मोहिनी बर्डे, बीड
पुरुष विभागातुन १५ कि मी प्रथम क्रमांक किरण म्हात्रे, परभणी, द्वितीय छगन बोंबले, परभणी, तृतीय क्रमांक किशोर मरकड, बीड चतुर्थ क्रमांक दिनकर लिलके, नाशिक, पाचवा क्रमांक, विशाल चव्हाण, जळगाव,
विशेष पारितोषिक संस्कृती वरहाड, सायली शिंदे, व वर्षा कदम यांना देण्यात आला. १५ किलो मीटर व ८ किलो मीटर मॅराथॉन स्पर्धेत पंचांनी उत्कृष्ट कामगिरी पार पाडली.