रोखठोक श्रीगोंदा….
श्रीगोंदा तालुक्यातील यळपणे येथील प्रेमी युगलांनी सोमवारी रात्री मनमाड दौंड लोहमार्गावरील महादेववाडी जवळ रेल्वेच्या खाली आत्महत्या करुन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेमुळे परीसरात एकच खळबळ उडाली आहे.
राजु बाबा कोळपे (वय ३८) व राणी राजेंद्र साबळे (वय ३० वर्षे) अशी दोन मयत प्रेमीयुगलांची नावे आहेत. या बाबत अधिक माहिती अशी की राजु कोळपे व राणी साबळे या दोघांचे अनेक महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. दोघेही विवाहित होते. सोमवारी सकाळी अकरा वाजता दोघेही घरातुन बाहेर पडले. या दोघांचा शोध लागत नसल्याने अखेर घरच्यांनी बेलवंडी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. सोमवारी रात्री उशिरा दोघांनी महादेववाडी शिवारात रेल्वेखाली आत्महत्या केली. या घटनेनंतर श्रीगोंदा तालुक्यातील यळपणे परीसरात खळबळ उडाली आहे. आत्महत्या का केली याचे कारण मात्र समजू शकले नाही.