रोखठोक जामखेड….
शहरातील माजी सरपंच बाळासाहेब राळेभात यांच्या पत्नी सौ रूपाली बाळासाहेब राळेभात यांनी आयोजित केलेल्या हळदी कुंकू कार्यक्रमात महीलांना वाण म्हणून विविध झाडांची रोपे वाटप करुन पर्यावरण जनजागृती चा संदेश दिला.
मकर संक्रांती निमित्ताने ठीक ठीकाणी महीलांचे हळदी कुंकवाचे कार्यक्रम होत असतात या कार्यक्रमात सहभागी झालेल्या महीलांना एक भेट म्हणून संसार उपयोगी वस्तू चे वाण दिले जाते. मात्र जामखेड येथील माजी सरपंच बाळासाहेब अर्जुन राळेभात यांच्या पत्नी सौ रूपाली बाळासाहेब राळेभात यांनी आयोजित करण्यात आलेल्या हळदी कुंकू कार्यक्रमात महीलांना वाण म्हणून झाडांची रोपे वाटप करुन पर्यावरण जनजागृती केली. यावेळी मंदाकिनी विष्णुपंत मुरुमकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या हळदी कुंकू कार्यक्रमात प्रभागातील सौ रूपाली बाळासाहेब राळेभात सिमा सतिश राळेभात सुमन आबासाहेब बांदल आरती कृष्णानंद आष्टेकर आरती बाबुराव गव्हाणे या महीलांनी कार्यक्रमास आलेल्या महीलांना हळदी कुंकू लावले व नंतर वाण म्हणून गुलाब मोगरा जाईजुई सह विविध प्रकारची रोपे भेट दिली व पर्यावरणाची जनजागृती केली.