रोखठोक जामखेड….

तालुक्यातील नान्नज व जवळा परिसरातील अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करत एक लाख नऊ हजार ५२६ रूपयांचा मुद्देमाल जप्त करत नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामपंचायत निवडणूकीच्या पाश्र्वभूमीवर एवढी मोठी कारवाई केल्याने अवैध दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

ग्रामपंचायत निवडणूकीच्या पाश्र्वभूमीवर तालुक्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री होत असते. यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केल्याने एकच खळबळ उडाली आहे. विभागीय आयुक्त पुणे विभाग प्रसाद सुर्वे, अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क नगर गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क नगर निरीक्षक डी. आर ठोकळ, दुय्यम निरीक्षक एम. एस. धोका, जामखेडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत निवडणूकीच्या पाश्र्वभूमीवर नान्नज व जवळा परिसरात नऊ जणांविरोधात धडक कारवाई करत देशी विदेशी दारू, गावठी दारू, रसायन, बीअर असा एकुण १ लाख ९ हजार ५२६ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एवढी मोठी कारवाई झाल्याचे अवैध दारू विक्री करणाऱ्यांच्या धाबे दणाणले आहेत.
सदरची कारवाई निरीक्षक ए. बी. बनकर, एम. एस. धोका, डी. आर. ठोकळ, दुय्यम निरीक्षक सचिन वामने, साहाय्यक फौजदार बी पी. तांबट, नंदकिशोर ठोकळ, श्रीमती एस. आर. आहेर यांच्या पथकाने केली.
वरील घटनेचा तपास ए. बी. बनकर व एम एस. धोका हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here