

जामखेड शहरात दोन गोळी सेंटरवर पोलिसांचा छापा,२ लाख ३५ हजाराचा गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल
जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरातील बीड रोडवरील दोन गोळी सेंटरवर आर्थिक गुन्हे शाखा अहिल्यानगर व जामखेड पोलिसांनी छापा टाकून सुमारे २ लाख ३५ हजार रुपये कीमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. गोळी सेंटरच्या नावाखाली हा गुटखा विक्री करताना पोलिसांना सापडला आहे. या प्रकरणी दोन गोळी सेंटर चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामखेड शहरातील बीड रोडवरील ग्रामिण रुग्णालयाच्या समोर जय भगवान बाबा गोळी सेंटर व जय भगवान गोळी सेंटर आशी दोन गोळी सेंटर आहेत. याठिकाणी गोळी सेंटरच्या नावाखाली अवैद्य गुटखा विक्री होत असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना मिळाली. या अनुषंगाने मंगळवार दि २४ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जामखेड पोलीसांच्या मदतीने घटनास्थळी आसलेल्या दोन्ही गोळीसेंटरवर छापा टाकला. यावेळी या दोन्ही दुकानात तंबाखू जन्य पदार्थांचे विक्री व तयार करण्यास प्रतिबंध असलेला गुटखा पानमसाला गुटखा असा एकुण २ लाख ३५ हजार ८४४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यावेळी गोळीसेंटर चालक आरोपी छबू विश्वनाथ तोंडे, वय ६५ रा. सतेवाडी ता. जामखेड व निलेश श्रीराम कोल्हे वय ३५ रा. राजुरी, ता. जामखेड या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पो. कॉ कुलदिप घोळवे यांनी दिलेल्या फिर्यादी वरील दोन्ही आरोपींन विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरील घटनेचा तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा जाधव या करीत आहेत.

चौकट
जामखेड शहरासह तालुक्यात अनेक भागातील गोळीसेंटरवर अवैद्य गुटखा तसेच आनेक ठिकाणी अवैद्य मावा विक्री होत असताना पहावयास मिळते. मात्र स्थानिक पोलीस याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करित आहेत. अहिल्यानगर येथुन आर्थिक गुन्हे शाखेचे पथक जामखेड मध्ये येऊन अवैद्य गुटख्याच्या ठिकाणी कारवाई करते मग स्थानिक पोलीस काय करतात? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतुन विचारा जात आहे. काही दिवसांपूर्वी जामखेड मध्ये ड्रग्ज विक्री करणाऱ्या दोघांवर कारवाई करण्यात आली होती यावरून शहरातील अवैद्य धंदे वाढत असताना दिसुन येत आहेत.





