

फक्राबाद येथे केमिकलद्वारे दुध भेसळ करणार्या अड्यावर छापा, 17 लाखांचा मुद्देमाल जप्त
गेल्या दोन महिन्यांपासून सुरु होता दुध भेसळीचा गोरखधंदा
जामखेड प्रतिनिधी
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अन्न आणि औषध प्रशासनाच्या मदतीने जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथे केमिकल व इतर पदार्थांचा वापर करून कृत्रिम दूध तयार करून विक्री करित असलेल्या ठिकाणी छापा टाकला. मागिल दोन महिन्यांपासून रामदास नवनाथ उबाळे या व्यक्तीच्या शेतवस्तीवरील घरात दुध भेसळीचा हा गोरखधंदा सुरु होता. पोलिसांकडून दुध तयार करण्यासाठी लागणारे ऑईल, केमीकल पावडर, केमीकल पासुन तयार केलेले दुध, व दोन चारचाकी वहाने असा एकुण 17 लाख 32 हजार 816 रुपये कीमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी तीन जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामदास नवनाथ उबाळे वय 46 रा. फक्राबाद. ता. जामखेड, समीर कमरुद्दीन शेख, वय 30 वर्षे. रा. उंबरे ता. राहुरी व आफताब कलीम शेख वय 28 वर्षे रा. शुक्लेश्वर चौक, राहुरी अशा तीन आरोपींची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना जामखेड तालुक्यातील फक्राबाद याठिकाणी दूध भेसळीचा गोरखधंदा धंदा सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली. याच आनुशंगाने अन्न व औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक राजेश बडे यांच्या सह त्यांच्या पथकाने शनिवार दि 14 फेब्रुवारी रोजी सकाळी फक्राबाद येथे घटनास्थळी छापा टाकला.

अन्न आणि प्रशान विभागाचे अधिकारी व पोलीस पथकाने दुध संकलन केंद्राच्या ठिकाणची पाहणी केली असता सदर ठिकाणी दुध तयार करण्यासाठी वापरले जाणारे 6 ड्रममध्ये 1198 लिटर Paraffin नावाचे केमीकल व दुध पावडर मिळून आली. सदर केमीकल बाबत ताब्यातील इसमांकडे विचारपुस करता त्यांनी सदरच्या केमीकल पासुन दुध तयार करण्यात येत असुन, 6 ड्रमधील केमीकल पासुन 24 हजार लिटर दुध तयार होत असल्याचे कळवले. त्यावेळी अन्न व औषध सुरक्षा अधिकारी यांनी सदर केमीकलची पाहणी केली. या छाप्यात मानवी शरीरास व जिवीतास घातक व मानवी शरीरावर विपरीत परिणाम करणारे केमिकल व पावडर आढळून आली. यावेळी एम एच 17 के. 7946 वहानातुन 200 लिटर क्षमतेचे निळ्या रंगाचे प्लास्टिक ड्रम हे जमिनीवर उतरवीत असल्याचे आढळून आले.

यामध्ये एकुण 10 प्लास्टिक ड्रम होते. त्यापैकी 4 ड्रम रिकामे व 6 ड्रममध्ये पांढर्या रंगाचे दुध सदुष्य लिक्विड आढळुन आले. या ठिकाणाहून 2 लाख 39 हजार 600 रु कीमतीचे 1198 लिटर Paraffin Oil, 81 हजार 56 रु किमतीचे प्लास्टिक बॅगमध्ये पांढर्या रंगाची 300 किलोग्रॅम पावडर, 12 हजार 160 रु कीमतीचे 320 लिटर केमिकल पासुन तयार केलेले दुध, तसेच 14 लाख रुपये कीमतीचे दोन वहाने असा एकुण 17 लाख 32 हजार 816 रुपये कीमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.

हि कारवाई पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी व जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्यासह उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस अंमलदार र्हदय घोडके, दिपक घाटकर, राहुल द्वारके ,गणेश लबडे ,संतोष खैरे, पोलीस नाईक शामसुंदर जाधव, भीमराज खडसे, लक्ष्मण खोकले, पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, फुरकान शेख, बिरप्पा करमल, भिमराज खर्से, राहुल डोके, सुनील मालकर, चालक अरुण मोरे, उमाकांत गाढवे, महादेव मिसाळ यांच्या पथकाने केली आहे.







