नृत्यांगनावर हल्ला करणार्‍या आरोपीस जामखेड पोलीसांनी केले जेरबंद

जामखेड प्रतिनिधी

तु मला फोनवर बोलत का नाही, माझा नंबर ब्लॉक का केला या रागातुन आरोपी राहुल अशोक कचरे याने नृत्यांगना आसलेल्या महीलेवर कोयत्याने वार केले होते. या हल्ल्यात नृत्यांगना गंभीर जखमी झाली होती. या प्रकरणी महीलेने दिलेल्या फिर्यादीवरुन वरील आरोपी विरोधात खुनाचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हांपासून आरोपी हा गेल्या दहा बारा दिवसांपासून फरार होता. अखेर जामखेड पोलीसांना या आरोपीस अटक करण्यात यश आले.

याबाबत अधिक माहिती अशी की गुरुवार दि.05 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 10.00 वाजण्याच्या सुमारास फीर्यादी महीलेस आरोपी राहुल कचरे याने फोन केला व तो म्हणाला की, तु माझ्याशी फोनवर बोल, माझे तुझ्यावर प्रेम आहे. तु जर बोलली नाही तर मी तुला मारीन अशी धमकी दिली होती. त्यावेळी फीर्यादी महीलेने त्याचा फोन कट केला होता. त्यानंतर शुक्रवार दि. 06 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 02 वाजण्याच्या च्या सुमारास फीर्यादी गायत्री सावंत ही आपल्या रूमवर मैत्रिण हिचेसोबत होती. यावेळी अचानक फीर्यादी महीलेवर आरोपीने कोयत्याने बोटांवर, हातावर व डोक्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले होते, व घटनास्थळाहुन फरार झाला होता.

या प्रकरणी गायत्री तुषार सावंत वय 26 वर्षे धंदा, नृत्यांगना रा. वाघोली ता. जि. पुणे हल्ली रा. तपनेश्वर गल्ली, जामखेड जि. अहिल्यानगर हीने दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी राहूल अशोक कचरे, रा. खळेगाव ता. गेवराई जि. बीड याच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेंव्हापासून सदर आरोपी हा फरार होता.

त्यांनतर सदर आरोपीचा जामखेड पोलिस शोध होते. यावेळी शोध घेत असताना दि. 14 फेब्रुवारी रोजी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की, नृत्यांगनावर हल्ला केलेला आरोपी राहल अशोक कचरे हा धाराशिव जिल्ह्यातील भुम येथिल बसस्थानकावर येणार आहे असे समजले.

यानंतर पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी ही माहीती गुन्हे शोध पथकाचे पो.कॉ. देविदास पळसे , पो. कॉ. कुलदिप घोळवे, पो. कॉ. आकाश शेवाळे यांना दिली. यानंतर तातडीने सदरचे पथक खाजगी वाहनाने आरोपी राहल अशोक कचरे रा. खळेगाव ता. गेवराई जि. बीड. (हल्ली रा. मिलींदनगर, जामखेड ता. जामखेड जि.अहिल्यानगर) याचे शोध घेण्यासाठी भुम बसस्थानक येथे रवाना झाले. या पथकाने भुम पोलीसांचे मदतीने भूम बसस्थानक परिसरात शोध घेत असताना अशोक कचरे रा. खळेगाव ता गेवराई जि. बीड हल्ली रा. मिलींदनगर. जामखेड ता. जामखेड जि. अहिल्यानगर हा पथकास भुम बसस्थानक परिसरात एका झाडाखाली लपुन बसला असल्याचे दिसुन आले तेंव्हा पथकाने त्यास ताब्यात घेतले आहे.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, अहिल्यानगर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अहिल्यानगर, उप विभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद्र लोखंडे कर्जत विभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, सपोनि वर्षा जाधव मॅडम पो. कॉ. देविदास पळसे, पो. कॉ. कुलदिप घोळवे, पो. कॉ. आकाश शेवाळे, भूम पोलीस स्टेशनेच पो. ना संदेश क्षिरसागर तसेच दक्षिण विभाग मोबाईल सेलचे पो.कॉ. नितीन शिंदे व राहल गुंडु यांनी केली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here