जामखेड रोखठोक….

अज्ञात चोरटय़ांनी पती पत्नीला रॉड व दगडाने मारहाण करून त्याच्या जवळील एक लाख अकरा हजार रुपयांची चोरी केली. या प्रकरणी सहा अज्ञात चोरट्यान विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील गोडाऊन गल्ली येथील आईस फॉक्ट्री जवळ दि १३ रोजी पहाटे ही घटना घडली. तालुक्यात पोलीसांची अवैद्य धंद्यानवर कारवाई सुरू आसली तरी चोर्‍यांचे प्रमाण रोखण्यात अपयश येत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून चोर्‍यांचे सत्र सुरूच आहे त्यामुळे शहरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. फीर्यादी गणेश राम जाधव रा आईस फॉक्टरी हे आपल्या कुटुंबासमवेत झोपले पहाटे पावणेपाच वाजण्याच्या सुमारास सहा अज्ञात चोरटय़ांनी त्यांच्या घराच्या लोखंडी गेटचे व कीचन शेजारील रुमचे कुलुप तोडुन चोरट्यांनी घरात प्रवेश केला. तसेच पत्नीच्या अंगावरील मनी गंठण, आंगठ्या आसे ३२ ग्रॉम चे सोन्याचे दागिने व पाच हजार रुपये रोख व मोबाइल आसा एकुण एक लाख अकरा हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला. या दरम्यान चोरट्यांनी फीर्यादी गणेश जाधव व त्यांची पत्नी या दोघांना लोखंडी रॉड व दगडाने मारहाण करून जखमी केले. घटनास्थळी अहमदनगर येथुन डॉग स्कॉड ला पाचारण करण्यात आले होते. जामखेड पोलीस स्टेशन ला चोरी प्रकरणी सहा आज्ञात चोरट्यांन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी भेट दिली. पुढील तपास सपोनि महेश जानकर हे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here