रोखठोक मुंबई..

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून राज्य कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन आता राज्यातील पाचवी ते आठवी पर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षण मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार आता २७ जानेवारीपासून शाळा सुरू होणार आहेत.

मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचे नियम पाळूनच शाळा सुरू करा अशा सूचनाही यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. शाळा सुरू करत असताना स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरू कराव्यात अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here