गुण्यागोविंदाने रहाण्याची शिकवण पैगंबरांनी दिली-जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात.
जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने केले होते इप्तार पार्टीचे आयोजन
जामखेड प्रतिनिधी दि 21 एप्रिल
आपल्या देशात सर्वच समाज गुण्यागोविंदाने व एकमेकांशी सहकार्य ठेवून आनंदाने राहात आहे. काही विघ्नसंतोषी लोक गैरसमज पसरवून सातत्याने यात फुट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. समाजात वावरताना जी एकमेकांसोबत गुण्यागोविंदाने रहाण्याची शिकवण पैगंबरांनी दिली. त्याचे अनुकरण आयुष्यभर करावे. असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात यांनी व्यक्त केले.
जामखेड पोलीस स्टेशनच्या वतीने पवित्र रमजान महिन्यानिमित्त दरवर्षीप्रमाणे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या संकल्पनेतून सामाजिक सलोखा व राष्ट्रीय एकात्मता जोपासण्यासाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. संपुर्ण महिना रोजा (उपास) ठेवून रोजेदारांकडून त्यागाचे जिवन जगण्याचा प्रयत्न केला जातो. या आनंदोत्सवात सहभागी होवून पोलीस स्टेशनच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष मधुकर राळेभात, भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद, हज कमिटीचे सदस्य सलीम बागवान, शहर काझी व मुस्लिम परिषदेचे नेते अजहर भाई काझी, वकील संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड. शमा हाजी कादर शेख, मौलाना खलील, राजू भाई खान, फरमान भाई नालबंद, माजी ग्रामपंचायत सदस्य इस्माईल सय्यद, मुख्तार सय्यद (जनता टेलर), प्रा.लक्ष्मण ढेपे, जेष्ठ नेते शेरखान भाई, नगरसेवक शामीर सय्यद, नादीर हाजी, प्रहारचे शहर अध्यक्ष नय्युम सुभेदार, जाकीर शेख, उमर कुरेशी, सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब गायकवाड, जमीर सय्यद, डाँ कैलास हजारे, भाजपा शहर अध्यक्ष बिभीषण धनवडे, सरफराज पठाण, पत्रकार लियाकत शेख, शिवाजी इकडे, आबेद खान, नासीर सय्यद, बिलाल शेख आदी मान्यवरांबरोबरच तालुक्यातील सर्व मौलाना, शांतता समिती सदस्य, मुस्लिम समाज सदस्य, मुस्लिम पंच कमिटी, विविध राजकीय पक्ष संघटनांचे पदाधिकारी, पत्रकार, सर्व पोलीस कर्मचारी, हिन्दु-मुस्लिम समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक महेश पाटील म्हणाले की, जामखेड तालुका हा राष्ट्रीय एकात्मतेच्या दृष्टीने चांगला तालुका आहे. येथे हिंदू मुस्लीम बांधवांसह सर्व समाज घटक आनंदाने राहतात आहेत. हेच वातावरण आपल्याला कायमस्वरूपी टिकवून ठेवण्यासाठी मुस्लिम समाजातील सर्व घटकातील नागरीकांची गरज लागेल. तुम्ही सर्वांनी मिळून सहकार्य करावे. भविष्यात जामखेड मध्ये शांतता ठेवण्यासाठी जामखेड पोलीस सक्षम आहेत जामखेड तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आम्ही अहोरात्र परिश्रम घेत आहोत. या मध्ये राष्ट्रीय एकात्मतेचे उत्तम उदाहरण म्हणजे जामखेड करांनी वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. शमा हाजी कादर शेख यांची निवड केली असेही मनोगत पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.याबरोबरच त्यांनी उद्या असणाऱ्या रमजान ईद निमित्त सर्व मुस्लीम बांधवांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी मौलाना खलील यांनी सत्याच्या मार्गावर सतत चालत राहण्याचे आवाहन केले. इफ्तार पार्टीचे आयोजन केल्या बद्दल जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील व सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे समाजातर्फे अजहर काझी यांनी स्वागत केले. नगरसेवक शामीर सय्यद, कैलास हजारे, अजय काशिद, आदी मान्यवरांचीही यावेळी भाषणे झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल बडे, पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती, पोलीस नाईक अविनाश ढेरे, (गोपनीय शाखा), अजय साठे, आजीनाथ जाधव, दिनेश गंगे सह सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी विषेश परीश्रम घेतले.