जामखेड प्रतिनिधी
तालुक्यातील घोडेगाव, पाटोदा व खर्डा येथील तीन जणांचा वेगवेगळ्या घटनेत एकाच दिवशी मृत्यू झाला. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी जामखेड पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या बाबत समजलेली माहिती अशी की जामखेड शहरातील कर्जत रोडवरील एका विहीरीत मयत अमोल विश्वनाथ मोरे वय २५, रा. पाटोदा गरडाचे याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. बरेच दिवस झाले आसल्याने सदरचा मृतदेह विहिरीच्या पाण्यात तरंगताना अढळुन आल्याने ही गोष्ट नागरीकांच्या आज लक्षात आली. दुसरी घटना तालुक्यातील घोडेगाव या ठिकाणी घडली असुन मयत दत्तात्रय दगडु आडसूळ वय ५० वर्षे रा. घोडेगाव याचा देखील मृतदेह विहिरीत पडुन पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. सदरची घटना पहाटेच्या पुर्वी घडली आहे. या बाबत अशोक दत्तात्रय आडसूळ यांनी जामखेड पोलीस स्टेशनला खबर दिली आहे. तर तीसरी घटना देखील तालुक्यातील खर्डा या ठिकाणी याच दिवशी घडली असुन सचिन हरीशचंद्र डुकरे वय २३ वर्षे याने देखील खर्डा येथील आपल्या रहात्या घरी दुपारी एक वाजण्याच्या पुर्वी दोरी च्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. या प्रकरणी रतिलाल रोहीदास डोके यांनी जामखेड पोलीस खबर दिली आहे. एकाच दिवशी तीघांचा वेगवेगळ्या घटनेत मृत्यू झाला आसल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तीनही जणांवर जामखेड ग्रामीण रुग्णालय शवविच्छेदन करण्यात आले असुन जामखेड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.




