‘
रोखठोक जामखेड….
जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाचा असलेल्या न्हावरा-इनामगाव-काष्टी-श्रीगोंदा-जळगाव-जामखेड (राज्यमार्ग-५५) या राज्यमार्गाला आता राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा प्राप्त झाला आहे.आता हा राज्यमार्ग राष्ट्रीय महामार्ग ५४८(ड) म्हणुन नव्याने मंजुर झाला असुन (सेक्शन-२) आढळगाव ते जामखेड या ६२.७७५ कि.मी. दुपदरी महामार्गाच्या कामाची इ-निविदा नुकतीच जाहीर झाली असल्याने राष्ट्रवादीचे युवा नेते,आ.रोहित पवार पुन्हा एकदा ‘पॉवरफुल’ ठरले आहेत.
पंधरा दिवसांपुर्वीच नगर-सोलापुर ५१६ (अ) या नवीन चौपदरी राष्ट्रीय महामार्गाच्या कामात असणारे अडथळे दूर करून या महामार्गाला मंजुरी मिळवली होती आता त्या कामाची ई-निविदा निघाली आहे. पंधरा दिवसांतच दोन्हीही राष्ट्रीय महामार्गाच्या कामांची निविदा निघाल्याने मतदारसंघासाठीच नव्हे तर अनेक तालुक्या-जिल्ह्यांसाठी हे महामार्ग विकासाची नवी दिशा देणारे ठरणार आहेत.या नवीन महामार्गांमुळे दळणवळणाची सुविधा वाढण्यास मदत होणार आहे.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कायम संपर्कात राहून पाठपुरावा केल्याने आ.रोहित पवार यांनी घेतलेल्या परिश्रमाचे मतदारसंघाला फलित मिळाले आहे.राज्यमार्ग (क्र.५५) चे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर होऊन आता या मार्गाचा राष्ट्रीय महामार्ग क्र.५४८ (ड)असा सामावेश झाला असुन नव्याने होणारा हा मार्ग १८ महिन्यांच्या कालावधीत पुर्ण होणार आहे. रस्ता झाल्यापासून १० वर्षे त्याच्या डागडुजीचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.पुढील काळात या महामार्गांमुळे मोठा कायापालट होईल असा विश्वास आ. रोहित पवार यांनी व्यक्त केला.या मार्गासाठी खा.सुजय विखे यांचेही प्रयत्न सुरू होते.
______________________________
राष्ट्रीय महामार्गांचे उजळले भाग्य!
आ.रोहित पवार हे कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार म्हणुन निवडुन आले.मात्र आमदार म्हणुन त्यांचे कार्य मतदारसंघापुरते सिमीत राहिले नाही.राज्य पातळीवरचे अनेक प्रश्न वर्षात मार्गी लावण्यात त्यांना यश आले आहे.सर्वात महत्वाच्या असलेल्या राष्ट्रीय महामार्गांचे भाग्यही त्यांच्यामुळे उजळले आहे.