भंडारा दि ९ ,प्रतिनिधी

संपुर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना शनिवारच्या रात्रीला घडली आहे. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय मध्ये अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये ( SNCU ) आग लागल्यामुळे दहा बालकांचा धुरामुळे गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शनिवारच्या मध्यरात्री जवळपास दोन वाजेला ही आग लागली असून १७ बालकांपैकी ७ बालकांना वाचविण्यात यश आलेला आहे.

१७ पैकी १० बालकांचा मृत्यू.

शनिवारी रात्रीच्या दरम्यान अचानक जिल्हा सामान्य रुग्णालयातील SNIC युनिटच्या आऊट बोर्ण युनिट मधून धूर निघत असल्याचे समोर आले. ड्युटीवर असलेल्या नर्सने दार उघडून बघितले असता त्या रूम मध्ये मोठ्या प्रमाणात धूर होता त्यामुळे त्यांनी लगेच दवाखान्यातील अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर अग्निशामक दल
घटनास्थळी पोहोचून दवाखान्यातील लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. या SNIC युनिय मध्ये आऊट बोर्ण आणि इन बोर्ण अशी दोन युनिट आहेत. यापैकी इन बोर्ण मध्ये असलेले सात बालक वाचविण्यात आले तर आऊट बोर्ण युनिटमधील १० मुलांचा अतिशय दुर्दुवी मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here