प्रा. सचिन गायवळ (सर) यांच्या वाढदिवसाच्या निमित्त घेतलेल्या आरोग्य शिबिरास 1232 रुग्णांनी घेतला लाभ.

जामखेड (प्रतिनिधी) प्राध्यापक सचिन सर गायवळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिनांक 29 जानेवारी रोजी खर्डा शहरांमध्ये भव्य महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरामध्ये मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व हृदयाच्या ईसीजी मशीन द्वारे तपासणी ब्लड प्रेशर शुगर तसेच हाडांची तपासणी करून कानाची व ज्या रुग्णांना कानाचा ऐकू येत असेल त्यांना सर्व नियंत्रण तात्काळ त्या ठिकाणी देण्यात आले.

या शिबिराचे उद्घाटन खर्डा येथिल डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष संतोष लोंढे व डॉ. अंकुश गोपाळघरे, डॉक्टर बिपिनचंद्र लाड, डॉ. राजेंद्र नागरगोजे, डॉ. राळेभात, डॉ. अनपट, यांच्या सहित सर्व डॉ. असोसिएशनच्या वतीने करण्यात आले. या शिबिरामध्ये आलेल्या गोरगरीब व गरजू रुग्णांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून सर्व आजारावर मोफत उपचार करून प्रचंड असा शिबिरास त्यांनी प्रतिसाद दिला. या शिबिरात एकुण 1232 रुग्णांनी लाभ घेतला. खर्डा शहरांमध्ये अशा प्रकारचा सर्व आजार वरील मोफत आरोग्य शिबिर यशस्वी पार पडले. याप्रसंगी प्राध्यापक सचिन सर गायवळ यांच्या भावी सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रासाठी सर्वच मान्यवरांनी यावेळी भरभरून शुभेच्छा देऊन मनोगत व्यक्त करून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

हे आरोग्य शिबिर प्रा. सचिन सर गायवळ विचार मंच जामखेड व देवयानी मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल पुणे येथील डॉ. अमोल लिमये, डॉ. राजीव सांख्य, डॉ. अरुण टाकीदार, डॉ. श्रीमती मंजरी पाटील, डॉ. श्रीमती कीर्ती घोडके, डॉ. उद्धव भोगरा, डॉ. दीक्षित भोग्रा, श्रीमती श्रुती भोगरा, डॉक्टर प्रतिभा पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले. हे आरोग्य शिबिर यशस्वी पार करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते दत्तराज पवार, कल्याण सुरवसे, योगेश सुरवसे, बबलू गोलेकर, शकील मोमीन,अक्षय कातोरे पाटील, बापूसाहेब ढगे,श्याम महाराज सकट, हमीद मदारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here