आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्या बद्दल शाळेच्या वतीने काळे सर यांचा सन्मान
जामखेड (प्रतिनिधी) नवीन मराठी प्राथमिक शाळेचे शिक्षक काळे सर यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने नुकताच आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला त्या बद्दल शाळेच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आदर्श शिक्षक श्री. विजय काळे सर यांना नुकताच त्यांनी शैक्षणिक कार्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचा 74 व्या प्रज्ञासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमात वैद्यकीय अधिकारी डॉ. कुंडलिक अवसरे यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी ध्वजारोहण वैद्यकीय अधिकारी डॉ. कुंडलिक अवसरे यांच्या हस्ते संपन्न झाले होते.
नविन मराठी प्राथमिक शाळेचे शिक्षक विजय काळे सर यांचे शैक्षणिक कार्य चांगले आसुन आजपर्यंत हजारो विद्यार्थी त्यांच्या हातुन घडले आहेत व उच्च पदावर गेले आहेत. अशा विद्यार्थ्या प्रिय शिक्षक आसलेले काळे सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला त्या बद्दल पालकांनी आनंद व्यक्त केला आहे. या प्रसंगी संस्थचे सचिव राजेंद्र देशपांडे, संचालक बंडोपंत पवार, नंदकिशोर देशमुख, लक्ष्मीकांत देशमुख, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष घनशाम चिंचकर, अमोल गिरमे, शाळेच्या मुख्याध्यापिका राळेभात एम. के, सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने हजर होते.