हातातला कोयता काढुन लेखनी दिली म्हणून तुमच्या हातात काजवा आले – पोपटराव काळे

जामखेड (प्रतिनिधी) आपल्या पदाची जाणीव ठेऊन काम केले तर यश नक्कीच मिळते. गरीबांचे दुख:इतर कोणावर येऊ नये म्हणून माझा प्रयत्न असतो. संघर्षमय बालपण व शिक्षण घेऊन मी उच्च पदावर गेलो. आई वडीलांनी माझ्या हातातील कोयता काढुन हतात लेखनी दिली म्हणून काजवा तुमच्या हतात वाचायला आले आसे मत शिक्षण अधिकारी पोपटराव काळे यांनी व्यक्त केले.
जामखेड येथे जिव्हाळा फाऊंडेशनच्या पुढाकारातून झालेल्या संवाद परिसंवाद, पुस्तक प्रकाशन व व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. पोपटराव काळे यांच्या ‘काजवा, मनोहर इनामदार यांच्या ‘गवसणी’ व गोकुळ गायकवाड यांच्या ‘बोलती दोहे आणी गाथा’ या पुस्तकाचे प्रकाशक सोहळा संपन्न झाला यावेळी पोपट काळे बोलत होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात तर प्रमुख पाहुणे म्हणून भिवंडी येथील न्यायाधीश सुदाम श्रीराम काळे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, दि. पिपल्स एज्युकेशनल सोसायटीचे उपाध्यक्ष अरुण चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख, पोपटराव काळे, आदर्श शिक्षक मनोहर इनामदार, गोकुळ गायकवाड, अनंता खेत्रे, संजय वराट, दत्तात्रय काळे, दशरथ कोपनर, आय. य. पवार, भानुदास बोराटे, ओंकार देशमुख, विनायक राऊत, मयुर भोसले, जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, अशोक वीर, अविनाश बोधले, पप्पू सय्यद, किरण रेडे तसेच कार्यक्रमाचे निमंत्रक गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे, ल. ना. होशिंग विद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत होशिंग, मेरा धरती सुरज परिवाराचे संतोष पवार, विश्वदर्शन न्युजचे संपादक गुलाब जांभळे व जिव्हाळा फाऊंडेशन जामखेड हे होते.

पुढे बोलताना माजी शिक्षणाधिकारी पोपटराव काळे म्हणाले की, कोणत्याही क्षेत्रात चांगले काम करून घेण्यासाठी शास्ती न लावता गोड बोलून आपण चांगले काम करून घेऊ शकतोत. मला परिस्थितीने घडविले जाणिव ठेवून काम पाहिले दुष्काळाच्या काळात सर्व शिक्षकांना एकत्रीत घेऊन झपाटून काम केले वर्षभरात ऐंशी शाळेत मुक्काम केला, पाच कोटी रुपये लोकवर्गणी गोळा केली. तालुक्यातील १०२ शाळा आयएसओ केल्या शैक्षणिक दृष्ट्या मागास असलेले जामखेड शैक्षणिक पर्यटन झाले. सर्व काम सामाजिक बांधिलकी म्हणून केले. परिस्थितीने घडलो ऊसतोड कामगाराचा मुलगा अधिकारी झाला असे काळे यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख व्याख्याते माजी शिक्षण संचालक दिनकरराव टेमकर यांचे आजचे शिक्षण व तणावमुक्ती या विषयावर सर्वाना मनमुराद हसवत व्याख्यान दिले. कार्यक्रमा दरम्यान न्यायाधीश सुदाम काळे, मनोहर इनामदार, गोकुळ गायकवाड यांनी आपले मनोगते व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here