महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ जामखेड शाखेच्या वतीने मा. सरपंच गफ्फारभाई पठाण यांना आदर्श पुरस्कार प्रदान

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील पाटोदा गरडाचे येथिल माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते गफ्फारभाई पठाण यांच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल त्यांना नुकताच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा आदर्श पुरस्कार देण्यात आला.

या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जामखेड नगरपरिषदेचे माजी नगरसेवक व भाजपाचे युवक नेतृत्व अमित चिंतामणी, संघटनेचे जामखेड शहराध्यक्ष फायकअली सय्यद, सरचिटणीस संजय वारभोग, कार्याध्यक्ष दत्तात्रय राऊत, जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट, उपध्यक्ष अशोक वीर, सचिव सत्तार शेख, सहसचिव पप्पुभाई सय्यद, अविनाश बोधले,किरण रेडे, संतोष बारगजे, श्वेता गायकवाड, संतोष गर्जे, राजू भोगील, अनिल धोत्रे, अजय अवसरे लाड, जगताप, पोकळे, पाराजी टेमकर, यांच्या सह आष्टी, करमाळा, जामखेड परिसरातील विविध मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना जेष्ठ पत्रकार दत्तात्रय राऊत म्हणाले कि सर्व जातीय धर्माना सोबत घेऊन गफ्फारभाई पठाण पाटोदा गावात वेगवेगळे उपक्रम राबवित असतात. जर गावामधून दिंडी जात असेल तर ते सर्व जवाबदारी स्वतः पार पाडतात सर्व समाजातील लोकांना न्याय देण्याचे काम गफ्फारभाई करत असतात त्याच्या या कामाची पावती म्हणून त्याचा आज महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here