रोखठोक जामखेड

तालुक्यातील जवळा परीसरातील विविध हॉटेल्स, हातभट्टी, व झुगार अड्यावर जामखेड पोलीसांनी छाप टाकला. या मध्ये एकुण दहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी अवैद्य धंद्यान विरोधात कारवाईचा धडाका सुरू ठेवला आसल्याने अवैद्य धंदे करणार्‍यांचे मात्र धाबे दणाणले आहेत.

जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना जवळा परिसरात अवैद्य धंदे सुरू आसल्याची गुप्त माहिती मिळाली त्यानंतर त्यांनी आपल्या पोलीस पथकाला त्या ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार दि ३० डिसेंबर रोजी जवळा गावात अवैद्य हातभट्टी सुरू आसलेल्या ठिकाणी पोलीसांनी कारवाई करत आरोपी सचिन दिलीप काळे, चंद्रकांन्त दादा काळे, सत्यभामा फुलचंद काळे, सर्व रा. जवळा यांच्या कडुन ३६०० रु कीमतीची ७२ लीटर हातभट्टीची गावठी दारू जप्त केली असुन आरोपींन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच जवळा परीसरातील हॉटेल आपुलकी हॉटेल महाराजा व हॉटेल जगदंबा या तीन हॉटेल वर छापा टाकून या हॉटेल मधिल ६४९६ रु देशी विदेशी दारू जप्त केली आहे. या घटनेत आरोपी कीरण जवान चव्हाण, नितीन रमेश रजपूत दोघे रा. नान्नज व वैभव विनायक साळवे रा. धोंडपारगाव अशा तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामखेड पोलीसांनी यानंतर दुसर्‍या दिवशी म्हणजे दि ३१ डिसेंबर रोजी जवळा परीसरातील वाळुंजकर मळा येथील जवळा ते तरडगाव रोडवरील चिंचेच्या झाडाखाली काही लोक तीरट नावाचा झुगार खेळत आसताना त्या ठिकाणी छापा टाकून आरोपी सोपान विठ्ठल शिंदे, चंद्रकांत शिवदास रोडे, लक्ष्मण अर्जुन पवार, तीघे रा. जवळा लक्ष्मण दशरथ पागीरे रा. मतेवाडी अशा एकुण चार जणांना पकडण्यात आले. त्यांच्या कडून झुगाराचे साहीत्य व ९२०० रु रोख जप्त करण्यात आले. अशा एकुण वेगवेगळ्या तीन कारवायांमध्ये एकुण दहा जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सा. फौ. विठ्ठल चव्हाण, संग्राम जाधव, आबासाहेब अवारे, विजयकुमार कोळी बाळासाहेब तागड पो. ना. लोखंडे यांच्या पथकाने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here