रोखठोक श्रीगोंदा….
श्रीगोंदा येथिल बाजार समितीचे संचालक लक्ष्मणराव नलगे यांचे चिरंजीव दादासाहेब नलगे वय ३५ वर्षे याने स्वतःच्या रिव्हॉल्व्हर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. शनिवारी पहाटे दौंड येथील राहत्या घरी ही घटना घडली आत्महत्या का केली याचे कारण मात्र अद्याप समजु शकले नाही.
बाजार समितीचा संचालक लक्ष्मणराव नलगे यांना दोन मुले आहेत. यातील दादासाहेब हा दौंड येथील व्यवहार पहात होता. त्याच्या कडे परवाना धारक रिव्हॉल्व्हर आहे. दादासाहेब हा गेल्या एक महिन्यापासून तणावाखाली होता. या मुळे आत्महत्या केली का याचे मात्र कारण अद्याप समजू शकले नाही. दादासाहेब याने काही दिवसांपूर्वी आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला होता. याचे फोटो देखील सोशल मीडियावर टाकले आहेत. त्या नंतर ही दुर्दैवी घटना घडली. त्याच्या मागे आई वडील पत्नी व एक मुलगा असा परीवार आहे.




