जामखेड रोखठोक….

कोरोना महामारीत प्रत्येक जण आरोग्याबाबत आधिक सजग झाला आहे. रोगप्रतिकारकशक्तीच कुठल्याही आजारात आपला बचाव करु शकते हे सर्वांनाच कळुन चुकले आहे. या बाबत जनजागृती व्हावी यासाठी जामखेड येथील तरुण शेख समिर सुजात याने सायकलवर जामखेड ते आजमेर या आरोग्याचा संदेश देण्यासाठी १११० कीलोमिटर सायकल रॉलीचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे आजमेर पर्यंत सायकलवर जात असताना प्रत्येक गावातील शाळा व कॉलेज येथील विद्यार्थ्यांना भेटुन कोरोना विषयी जनजागृती करणार आहे.

गेल्या आठ महिन्यांपासून कोरोना रोगांचा आपण सर्वजण सामना करत आहोत, या रोगाच्या काळात अनेकांना संक्रमण होऊन अनेक निष्पाप जीवांना आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे या रोगावर मात व जनजागृती करण्यासाठी जामखेड येथील शेख जमिल सुजाता वय ३६ वर्षे हा जामखेड ते आजमेर असा १११० की मी चा प्रवास करण्यासाठी सायकलवर १ जानेवारी २०२१ या नवीन वर्षाच्या पहाटे सहा वाजता सायकलवरून निघणार आहे. त्याला पोहचण्यासाठी आठ दिवस लागणार असुन दररोज जमिल हा दिडशे कीमी चा प्रवास करणार आहे. यामध्ये सकाळी व संध्याकाळी असे दोन टप्पे सायकल प्रवासाचे निश्चित केले आहेत. मात्र कैतुकास्पद बाब म्हणजे सायकलवर १११० कीमी प्रवास करत आसताना तो महाराष्ट्र, गुजरात व राजस्थान या राज्यातील शाळा व कॉलेज यांना भेटी देऊन कोरोना अजारा विषयी जनजागृती करणार आहे. यासाठी त्याने जामखेड तहसील कार्यालयाल व जामखेड पोलीस स्टेशन चे परवानगी पत्र घेतले आहे. त्याच बरोबर आरोग्य विषयी देखील जनजागृती करणार आसलेल्याची माहीती त्याने रोखठोक न्यूज शी बोलताना दिली. त्याच्या या धाडसी निर्णयाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कैतुक होत आहे. यावेळी त्याला त्याचे सहकारी मित्र डॉ महेश घोडके, डॉ प्रविण मिसाळ, डॉ अशोक बांगर, डॉ संजय वराट, डॉ पांडुरंग सानप, दिलीप पवार, भास्कर भोरे, शशिकांत राऊत यांनी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here