आ. रोहित पवार यांना श्रेय जाऊ नये म्हणून कुसडगांव चे पोलीस प्रक्षिक्षण केंद्राचे होतय राजकारण – आ. रोहित पवार

जामखेड (प्रतिनिधी) सध्या चे सरकार विकास कामांना खिळ घालण्याचे काम करत आहे. कारण विकास कामांचे श्रेय आ. रोहित पवार व राष्ट्रवादीला श्रेय जाऊ नये यासाठी प्रयत्न करत आहे. कुसडगाव चे पोलीस प्रक्षिक्षण केंद्र हे इतर ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न शिंदे सरकार करत आहे मात्र कुसडगाव चे पोलीस प्रशिक्षण केंद्र जामखेड च्या भुमिचे आहे आणि ते कुसडगाव याच ठिकाणी रहाणार आहे आणि जर कोणी हलवण्याचा प्रयत्न केला तर त्याला जशास तसे उत्तर देऊ आसे मत आ. रोहित पवार यांनी व्यक्त केले.

जामखेड शहरातील सध्या सुरू आसलेल्या नगरपरिषद कार्यालय, नवीन पोलीस वसाहत, पंचायत समिती नवीन इमारत, व एस टी बस स्थानक या ठीकाणी चालु आसलेल्या विविध विकास कामांची काल दि १ डिसेंबर रोजी आ. रोहित पवार यांनी पहाणी केली यावेळी ते बोलत होते. या वेळी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख प्रा मधुकर राळेभात, रमेश (दादा) आजबे, अमित जाधव, वसीम सय्यद, उमर कुरेशी, महेश राळेभात, कुंडल रालेभात, प्रशांत राळेभात, प्रविण उगले, गणेश हगवणे, महेश निमोणकर, हरीभाऊ आजबे, सह अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

जामखेड मधिल पोलीस कर्मचार्‍यांची निवास व्यवस्था बाबत मोठी आडचण होती त्या मुळे महाविकास आघाडी सरकारच्या काळात पोलीस वसाहतीस पंधरा ते सोळा कोटी रुपयांचा नीधी मंजूर करण्यात आला होता. याचे काम देखील पुर्ण झाले असुन याचे उद्घाटन देखील लवकरच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

सध्या महाविकास आघाडी च्या काळातील जामखेड नगरपरिषद, एस टी बस स्टँड, स्मशानभूमी, नाना नानी पार्क, शहरातील अंतर्गत रस्ते तसेच जामखेड येथे उपजिल्हा रुग्णालय, कुसडगांव येथिल पोलीस प्रशिक्षण केंद्र यासाठी कोट्यवधी रुपयांचा नीधी आणला व ती कामे सध्या सुरू आहेत. तसेच खर्डा व मिरजगाव या ठिकाणी पोलीस स्टेशन मंजूर करून आणले असुन ती चालु देखील झाली आहेत.

सध्या च्या शिंदे फडणवीस सरकारने मतदारसंघातील साडेतीनशे कोटी रुपयांचे कामांना स्थगिती दिली आहे. राजकीय द्वेश मनात ठेऊन सामान्य लोकांना वेठीस धरण्याचे काम हे सरकार करत आहे. भाजपचे सरकार असताना मिरजगाव या ठीकाणी मंजुर करुन आणलेले पोलीस प्रक्षिक्षण केंद्र शिंदे हे मंत्री आसताना देखील ते जळगाव या ठीकाणी गेले. कुसडगाव येथिल पोलीस प्रक्षिक्षण केंद्राचे सध्या ७० टक्के काम झाले आहे या ठीकाणची भरती व बांधकाम एकाच वेळी सुरू आहे मात्र रोहित पवार व राष्ट्रवादीला श्रेय जाऊ जाऊ नये म्हणून उपमुख्यमंत्री साहेब याचे राजकारण करतात मात्र कुसडगाव येथिल राज्य राखीव पोलीस क्रेंद आम्ही दुसरीकडे हालवु देणार नाही आसे देखील आ. रोहित पवार म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here