

खर्डा (दरडवाडी) येथील विनोद दराडेचा प्रवास प्रेरणादायी – आमदार रोहित पवार
जामखेड (प्रतिनिधी) इंडीयन आर्मी च्या अग्निवीर भरती परीक्षेत व स्पर्धेत यश मिळवलेल्या खर्डा येथील विनोद दराडे याने पॅराकमांडो मध्ये निवड झालेल्या पाच क्रमांक मध्ये निवड झाली ही जामखेड तालुक्यासाठी कैतुकास्पद गोष्ट आहे. विनोद दराडे आता देश सेवेसाठी जाणार आसल्याने त्याचा प्रवास प्रेरणादायी आहे आसे मत आमदार रोहित पवार यांनी त्याच्या सत्कारा दरम्यान व्यक्त केले.

हंगामी झालेल्या इंडीयन आर्मी च्या अग्निवीर भरती परीक्षेत व स्पर्धेत यश मिळवलेल्या खर्डा येथील विनोद दराडे याने पॅराकमांडो मध्ये निवड झालेल्या पाच क्रमांक मध्ये निवड झाली, सर्व अग्नविर एकूण 70 हजार परीक्षार्थितून फक्त 40 अग्निविरांची निवड झाली त्यातही दराडे यांनी यश संपादन केले फक्त पॅरा कमांडो मध्ये 5 जागा भरायच्या होत्या त्यातील भरती मध्ये पहिला क्रमांक पटकावला व अहमदनगर जिल्ह्यासह जामखेड तालुक्याची मान उंचावली त्यामुळे खर्डा ग्रामकृषित आनंदाचे वातावरण आहे.

पॅराकमांडो ही भारतीय सैन दलाची विशेष लष्करी तुकडी आहे (special Forces)जे दहशतवाद, सर्जिकल स्क्ट्राइक, स्पेशल ऑपरेशन, व युद्धदरम्यान काम करतात. खर्डा येथे नुकताच छत्रपती शिवाजी महाराज कनिष्ठ महाविद्यालयात कॉलेजचा विद्यार्थी गौरव म्हणून खाडे याचा सत्कार करण्यात आला.

यावेळी, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार, डॉ. महेश गोलेकर, मा.पंचायत समिती सदस्य श्री विजयसिंह गोलेकर ,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील खाडे, खर्डा ग्रामपंचायत सरपंच आसाराम गोपाळघरे, सत्कार मूर्ती विनोद संतोष दराडे व तरिकलाल बोलकं तात्या दराडे व सर्व शिक्षक वृंद, पत्रकार व खर्डा ग्रामकृषितील नागरिक उपस्थित होते.






