डॉ सादिभाई पठाण हे गरजु रुग्णांना देतात मदतीचा हात – माजी सरपंच समिरभाई पठाण

जामखेड प्रतिनिधी

आरोग्य चांगले असेल तर संपूर्ण कुटुंब आनंदी असते. जीवन अमूल्य आहे. तेव्हा आपल्या आरोग्याची काळजी घ्या. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आहे. आणि हीच रुग्णसेवा डॉ सादिभाई पठाण हे देखील गरजू रुग्णांन पर्यंत पोहचुन मदतीचा हात देत आहेत असे मत पाटोदा येथिल माजी सरपंच समिरभाई पठाण यांनी व्यक्त केले.

जामखेड शहरातील प्रसिध्द आसलेले जीवनसाई हॉस्पिटल चे संचालक डॉ सादिभाई पठाण यांचा नुकताच वाढदिवस साजरा करण्यात आला. या वेळी माजी सरपंच समिरभाई पठाण, माजी सरपंच गफ्फारभाई पठाण, खालेदभाई पठाण, मोसीनभाई पठाण, उमरभाई शेख, साहील पठाण, अनिस पठाण, जिब्रान शेख, डॉ भोसले, कांबळे मॅडम, लताताई सकट, पप्पुभाई सय्यद, धनराज पवार, अविनाश बोधले, सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या वेळी माजी सरपंच समिरभाई पठाण बोलताना म्हणाले की डॉ सादिभाई पठाण हे जीवनसाई हॉस्पिटल या ठीकाणी रुग्णांना चोवीस तास योग्य सेवा देतात. त्यांच्या रुग्णालयात सध्या आय सी यु, अस्थिरोग विभाग, जनरल सर्जरी, सह अत्यावश्यक सेवा अल्पदरात देण्यात येतात. रुग्णांचे आरोग्य चांगले रहाण्यासाठी डॉक्टरांचे आरोग्य चांगले राहो आसे सांगत डॉ सादिभाई पठाण यांना पाटोदा येथिल माजी सरपंच समिरभाई पठाण यांना त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here