त्याने मोबाईल चोरला म्हणून केला खुन, धोत्री शिवारातील तीस वर्षीय तरुणाच्या खुनाचा झाला उलगडा
जामखेड प्रतिनिधी
जामखेड जवळील साकत रोडवर पंधरा दिवसांपुर्वी झालेल्या ३० वर्षीय तरुणाच्या खुनाच्या आरोपांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले असून खुन झालेल्या तरुणाने आरोपीचा मोबाईल फोन चोरला या कारणावरून त्याचा खुन करण्यात आला. या प्रकरणी दोन आरोपींची नावे निष्पन्न झाली असून यातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आशी माहिती आज घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जामखेड चे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी दिली.
जामखेड जवळील साकत रोडवर पंधरा दिवसापुर्वी म्हणजे दि २४ ॲक्टोबर २०२२ रोजी लक्ष्मी पुजनाच्या दिवशी रात्री साकत रोडवरील धोत्री गावच्या हद्दीत जुन्या कॉटन जिनींग मिलच्या गेटसमोर कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी मयत गणेश शिवाजी वारे वय ३० वर्ष रा, संगम जळगाव, तालुका, गेवराई ,जिल्हा, बीड या तरुणास काठीने व पाईप ने मारहाण करुन खुन करण्यात आला होता. त्यामुळे जामखेड तालुक्यात खळबळ उडाली होती.
या प्रकरणी मयत गणेश वारे याचे वडील शिवाजी मारुती वारे रा. संगम जळगाव यांनी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपींना शोधण्यासाठी संतत्र दोन पथके तयार करण्यात आली होती. सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना गुप्त बातमीदारामार्फत माहीती घेतली असता आरोपी दिपक रणजीत भवर वय २३ वर्षे, रा. सावरगाव. ता. जामखेड. याने व त्याच्या दुसर्या साथीदाराने खुन केली असल्याची माहिती मिळाली. त्याच अनुषंगाने यातील दि ५ नोव्हेंबर रोजी यातील दिपक रणजीत भवर यास अटक केली असून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने खुन केलेल्या तरुणाने आरोपीचा मोबाईल चोरी केला होता या कारणाने खुन केला असल्याचे सांगितले.
मयत तरुण हा दि २३ ॲक्टोबर २०२२ रोजी मोहाफटा या ठीकाणी यातील मुख्य आरोपी दिपक रणजीत भवर व त्याच्या दुसर्या एका साथीदाराने त्यास स्कुटीवर बसवुन धोत्री शिवारात नेऊन त्यास नग्न करुन मोबाईल चोरलेला कोठे आहे आसे विचारुन त्यास काठ्या व पाईपने मारहाण करून खुन केला.
या प्रकरणी आरोपीस न्यायालयात नेले असता न्यायालयाने त्यास दि १० नोव्हेंबर २०२२ पर्यंत पोलीस पोलीस कोठडी सुनावली आहे. सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक अहमदनगर राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपुर स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, सहाय्यक पोलीस निरिक्षक श्री सुनिल बडे, पोलीस उप निरिक्षक श्री राजू थोरात, पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती, पो. हे. लाटे, पो. को कोठुळे, पो. को. विजय कोळी, पो. कॉ. आबासाहेब अवारे, सह डिबी पथकाचे कर्मचारी यांनी केली आहे.