गफ्फारभाई पठाण यांच्या वतीने सुवर्णपदक विजेती कु. आंचल चिंतामणी केला हीचा सत्कार
जामखेड प्रतिनिधी
चेन्नई येथे पार पडलेल्या राष्ट्रीय फ्लोअरबाॅल स्पर्धेत सुवर्णपदक मिळविल्याबद्दल कु. आंचल चिंतामणीचा पाटोदाचे संरपच गफ्फार पठाण यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
इंटरनॅशनल फ्लोअरबाॅल फेडरेशन आय एफ एफ अंतर्गत असलेल्या तामिळनाडू फ्लोअरबाॅल असोसिएशनच्या वतीने चेन्नई येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय फ्लोअरबाॅल स्पर्धेत कु. आंचल अमित चिंतामणी या जामखेडच्या सुकन्येने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे. या गौरवास्पद कामगिरीमुळे तिच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षांव होत असून गरडाचे पाटोदा चे संरपच गफ्फार पठाण यांनी कु. आंचल हीचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
राष्ट्रीय स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती कु. आंचल चिंतामणी जामखेड येथील प्रसिद्ध सुवर्णकार तथा माजी नगरसेवक अमित चिंतामणी यांची कन्या आहे. या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. यावेळी पठाण बोलताना म्हणाले की, कु. आंचल हिचे काम कौतुकास्पद तर आहेच परंतु या कामगिरीने तीने आपल्या आई वडीलांचे नाव तर मोठे केलेच परंतु या बरोबरच तीने जामखेडचे नाव राष्ट्रीय पातळीवरील पोहचवले आहे. याबद्दल तीचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. समाजाने खेळाडूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाणे महत्त्वाचे आहे.